शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयपणे, शांततेत मतदान करा : पोलीस आयुक्त

By admin | Updated: February 21, 2017 02:01 IST

महापालिका निवडणुकीच्या संबंधाने शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची कुठे गडबड होणार नाही, ....

नागपूर : महापालिका निवडणुकीच्या संबंधाने शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची कुठे गडबड होणार नाही, याची पोलिसांनी काळजी घेतली असून, नागरिकांनी निर्भयपणे आणि शांततेने मतदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान केले जाणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी उपराजधानीतील विविध भागात २७८३ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त राहणार असून, बंदोबस्तासाठी ९ पोलीस उपायुक्त , १२ सहायक आयुक्त, ३२ पोलीस निरीक्षक , १२५ उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षक तसेच महिला आणि पुरुष असे एकूण ४९२५ पोलीस कर्मचारी, १५०० होमगार्ड, ३ राज्य राखीव दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. ऐनवेळी कुठे काही अनुचित घटना घडल्यास शीघ्र कृती दलाची १० पथके सज्ज ठेवण्यात आली असून १२ सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक आणि ९६ जवानांसोबत नियंत्रण कक्षात चार राखीव पोलीस पथके आणि राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात ठेवण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळपासूनच पोलिसांची गस्ती पथके विविध भागात गस्त घालत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कशाचीही भीती न बाळगता शांततेत मतदान करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. कर्तव्य बजावतानाच जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपण स्वत: सिव्हिल लाईनमध्ये मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे डॉ. व्यंकटेशम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.(प्रतिनिधी)