शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक : रेल्वेच्या लोको पायलटसह दोघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 22:51 IST

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेच्या एका लोको पायलटला तर यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना घडली.

ठळक मुद्देतहसील, यशोधरानगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेच्या एका लोको पायलटला तर यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना घडली. सचिनकुमार राधेलाल वर्मा (वय ३४ हे बल्लारशा (जि.चंद्रपूर) च्या बालाजी नगरातील रहिवासी आहेत. ते रेल्वेत लोको पायलट म्हणून सेवारत आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे ते रेल्वेने बल्लारशा येथून नागपूरला आले. कर्तव्य संपल्यानंतर वर्कशॉपला आराम करण्यासाठी ते पायी जात होते. सोमवारी मध्यरात्री मोटरसायकलने आलेल्या चार आरोपींनी त्यांना रोखले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांना रोख तसेच मौल्यवान वस्तूची मागणी केली. वर्मा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या हातावर चाकू मारून त्यांना जखमी केले आणि त्यांच्या जवळचा मोबाईल तसेच ७०० रुपये आणि कागदपत्रे हिसकावून नेली. वर्मा यांनी वर्कशॉपमध्ये पोहचल्यानंतर ही घटना सहकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर तहसील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.त्याचप्रमाणे सोमवारी रात्री ११ च्या सुमारास उज्ज्वल अनिल निनावे (वय १८) हा बिनाकी मंगळवारी परिसरात राहणारा तरुण त्याचा मित्र अमन इंदूरकर याच्याकडे वैशाली नगरात लॅपटॉप आणायला गेला होता. लॅपटॉप मिळाला नाही. त्यामुळे तो दुचाकीने घराकडे परत निघाला. यशोधरानगरातील सेलिब्रेशन हॉलसमोर मोबाईल वाजल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा राहून तो मोबाईलवर वडिलांशी बोलू लागला. तेवढ्यात दुचाकीवर तीन आरोपी आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून उज्ज्वलला मारहाण केली आणि त्याच्या जवळचा ऐपल कंपनीचा २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. उज्ज्वलने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला.एका आठवड्यात पाच घटनाशहरात शुक्रवारी वाठोडात एका डॉक्टरला, रविवारी शांतिनगरात एका वृद्धेला, शनिवारी सोनेगावात एका तरुणीचे दागिने दोन भामट्यांनी चाकूच्या धाकावर लुटले तर सोमवारी रात्री यशोधरानगर आणि मंगळवारी पहाटे तहसीलमध्ये लुटमारीची घटना घडली. लुटमारीच्या या वाढत्या घटनांमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी