नागपूर : सणासुदीत भेसळखोर सक्रिय झाले आहेत तर दुसरीकडे भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) विभागाने कंबर कसली आहे. भेसळयुक्त खाद्यान्न विक्रेत्यांवर विभागाची करडी नजर असून अधिकाऱ्यांनी आतापासूनच विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.खाद्यान्नातील भेसळ लोकांना ओळखता येत नाही. त्याचाच फायदा भेसळखोरांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धावपळीच्या जीवनात बरेचजण हॉटेलमधून मिठाई किंवा दुकान वा मॉलमधून पॅकबंद पक्वान्न विकत आणतात. खरेदी केलेले पक्वान्न भेसळयुक्त तर नाही ना, यावर नेहमीच संशय व्यक्त केला जातो. पण त्यावर बोलण्यास कुणीही धजावत नाहीत. त्याचाच फायदा घेत भेसळखोर जास्त सक्रिय होतात. नफा कमविण्यासाठी जनतेच्या आरोग्याशी खेळण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. खव्याचे पदार्थ म्हटले की, भेसळीची आयतीच संधी मिळते. तपासणीदरम्यान भेसळ आढळल्यास अधिकारी तात्काळ कारवाई करणार असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एन.आर. वाकोडे यांनी ‘लोकमत’ला दिली. ‘एफडीए’चे अधिकारी सक्रिय४भेसळ करताना आढळून आलेल्या दुकानदारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थी असो वा उपवासादरम्यान रंगीबेरंगी मोदक दुकानातून पहायला मिळतात. पण तो रंग प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्न विभागाने खाद्यपदार्थांमध्ये ठराविक मर्यादेपर्यंत काही रंग वापरण्यास परवानगी दिली आहे. पण आज अनेक दुकानातून अत्यंत गडद रंगातील मोदक तसेच इतर मिठाई पहायला मिळते. चांदीच्या वर्खाच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हा फरक वरवर दिसणारा असला तरी मिठाईच्या आतला फरक डोळ्यांना जाणवत नाही. चक्क बनावट खवा तयार करण्यापर्यंत भेसळखोरांची मजल गेली आहे. भेसळखोर भेसळयुक्त खवा विकून आपली पोळी भाजून घेतात. मात्र त्यामुळे होणाऱ्या परिणामांना ग्राहकांना सामोरे जावे लागते.नोंदणी, परवान्याचा फलक बंधनकारक४दुकानाची नोंदणी किंवा परवाना घेतल्याचा फलक ‘९ बाय ६ फूट’ या आकारामध्ये लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही.भेसळयुक्त पदार्थांमुळे पोटाचा त्रास४भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने काही वेळा पोटाचा त्रास जाणवतो. तर त्यामुळे आरोग्यावर काही दीर्र्घ परिणामही होतात. या गंभीर बाबी लक्षात घेता विभागाची तपासणी मोहीम सुरू असल्याचे वाकोडे यांनी सांगितले. परराज्यातून येणाऱ्या खव्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भेसळीची शंका आल्याने ग्राहकांनी थेट अन्न प्रशासन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन वाकोडे यांनी लोकमतशी बोलताना केले. खव्याच्या पदार्थांचे २४ तासात सेवन करा४खव्याचे पदार्थ खरेदी केल्यापासून २४ तासांमध्ये, तर बंगाली मिठाई आठ ते दहा तासांमध्ये खावी, असे बॉक्सवर नमूद करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मिठाई हाताळण्यासाठी प्लॅस्टिकचे हातमोजे आणि डोक्यावर प्लॅस्टिकची पिशवी वापरण्याच्या सूचना सर्व मिठाई विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
भेसळयुक्त खाद्यान्नावर ‘एफडीए’ची नजर
By admin | Updated: August 4, 2015 03:28 IST