शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी ‘एफडीए’ची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:34 IST

दुधामध्ये भेसळ होत असल्याचा प्रकार थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोहीम राबविली आहे. नागपूर विभागात २३ ठिकाणी दूध संकलन केंद्रावर एफडीएच्या पथकाने तपासणी कारवाया केल्या आहे.

ठळक मुद्देदूध संकलन केंद्रावर आॅन दी स्पॉट तपासणी नागपूर विभागात २३ कारवाया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुधामध्ये भेसळ करून विक्री होत असल्याचे प्रकार अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळले आहे. पौष्टिक दुधाच्या नावावर लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. दुधामध्ये भेसळ होत असल्याचा प्रकार थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोहीम राबविली आहे. नागपूर विभागात २३ ठिकाणी दूध संकलन केंद्रावर एफडीएच्या पथकाने तपासणी कारवाया केल्या आहे.नागपूर विभागात रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते. भंडारा, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक दुधाची निर्मिती होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने डेअरीत येणाऱ्या दुधाची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसात नागपूर विभागात २३ डेअरीतील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले की, दुधातील भेसळीला आळा घालण्यासाठी त्यांची डेअरीत तपासणी करण्यात येत आहे. यासाठी अन्न तपासणाऱ्या विभागाचीही मदती घेण्यात येत आहे. नागपुरातील सात, भंडारा येथील चार, वर्ध्यातील एक तर गडचिरोली जिल्ह्यातील पाच डेअरीमधील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याच प्रमाणे भंडारा येथील सहा डेअरींमधील दुधाचे जागीच नमुने तपासण्यात आले. यात एकाही ठिकाणीचे नमुने अयोग्य आढळले नाही. उर्वरित १७ नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Governmentसरकार