शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

प्रसाद वाटपावर एफडीएची नजर

By admin | Updated: September 14, 2015 03:23 IST

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना प्रसाद वाटपासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

नागपूर : अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना प्रसाद वाटपासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी विभागातील सेतू कार्यालयात अथवा आॅनलाईन १०० रुपये शासकीय शुल्क भरून आॅनलाईन फॉर्म ‘ए’ भरायचा आहे. अर्थात महाप्रसादासाठी एफडीएचा आॅनलाईन परवाना बंधनकारक झाला आहे. सणासुदीच्या दिवसात भेसळीवर प्रतिबंध लावण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. यासंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जनजागृती नाही. त्यासाठी विभाग प्रयत्नरत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागीय सहआयुक्त (अन्न विभाग) शिवाजी देसाई यांनी लोकमतशी बोलताना दिली.धार्मिक उत्सवांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याच पदार्थांपासून प्रसाद तयार केला जातो. दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात खराब होतात. या काळात या पदार्थांना मागणी जास्त असल्याने भेसळीच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. याशिवाय प्रसाद वाटताना आणि त्या स्थळी स्वच्छता नसल्याने विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यावर प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यादरम्यान खवा आणि दुग्धजन्य पदार्थांचे विक्रेते आणि मिठाई दुकानांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. याशिवाय अन्य राज्यातून येणारा खवा गोदामात जास्त दिवस साठवून ठेवण्यात येत नाही. अशा खव्यापासून तयार होणारी मिठाई लवकरच खराब होते आणि खाण्यायोग्य नसते.