शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

एफडीएची कारवाई : नागपुरात २.१० लाखांचा गुटखा व तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:42 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धाडीत बुधवारी २.१० लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे. तंबाखू आणि गुटख्याची विक्री नागपुरातील ५०० पेक्षा जास्त पानटपऱ्यांवर विषारी सुपारीयुक्त खर्रा तयार करून करण्यात येते. अधिकाऱ्यांनी पानटपऱ्यांवर धडक मोहीम राबवून धाडी टाकून तंबाखूपासून तयार करण्यात येणाऱ्या खऱ्र्याचा व्यवसाय बंद करावा, अशी मागणी लोकांनी लोकमतशी बोलताना केली.

ठळक मुद्देपानटपऱ्यांवर खऱ्र्याची सर्रास विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धाडीत बुधवारी २.१० लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे. तंबाखू आणि गुटख्याची विक्री नागपुरातील ५०० पेक्षा जास्त पानटपऱ्यांवर विषारी सुपारीयुक्त खर्रा तयार करून करण्यात येते. अधिकाऱ्यांनी पानटपऱ्यांवर धडक मोहीम राबवून धाडी टाकून तंबाखूपासून तयार करण्यात येणाऱ्या खऱ्र्याचा व्यवसाय बंद करावा, अशी मागणी लोकांनी लोकमतशी बोलताना केली.अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे यांनी ६ फेब्रुवारीला मिळालेल्या माहितीच्या आधारे जुबेर किराणा, आझादनगर, टेका येथील पेढीवर पाळत ठेवल्यानंतर प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा (सागर), पानमसाला (पानबहार), सुगंधित तंबाखू (रत्ना, बाबा ब्लॅक, रिमझिम) आदींचा २.१० लाख रुपये किमतीचा २४७ किलो साठा विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. हा साठा अधिकाऱ्यांनी जप्त केला. साठ्यातून सहा नमुने घेण्यात आले. उर्वरित साठा अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसार जप्त करून अन्न व औषध प्रशासन कार्यालयात जप्त करण्यात आला.प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा मोहम्मद अहमद इंतियाज अहमद अन्सारी यांच्या मालकीचा असून, त्यांचे दुकान सीलबंद करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात कलम १८८, २७२ व ३२८ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी अनंत चौधरी, प्रफुल्ल टोपले, विनोद धवड, किरण गेडाम व महेश चहांदे यांनी केली.जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित व स्वादिष्ट सुपारी आणि खर्रा आदी प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, वितरण, साठवण व विक्री होत असल्याचे आढळल्यास, त्याबाबत प्रशासनास माहिती देऊन गुटखाबंदी प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केकरे यांनी केले आहे.

 

टॅग्स :FDAएफडीएraidधाड