शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश संवर्धनासाठी झटणारे रायपूरचे ‘फैज खान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 09:47 IST

गोवंशाचा मुद्दा समोर करून हा आपलाच ‘कॉपीराईट’ असल्याचा आविर्भाव आणणाऱ्या संघटनांना रायपूर येथील फैज खान यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून सुरू आहे पदयात्रागोसेवा सद्भावना यात्रेतून सामाजिक समरसतेचा संदेश

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या गोवंशाचे राजकीय महत्त्व गेल्या काही काळापासून जास्त वाढले आहे. गोवंश संरक्षणाच्या नावाखाली सामाजिक वातावरणदेखील गढूळ करण्याचा प्रयत्न झाला. मात्र गोवंश संवर्धन हा धर्माशी जुळलेला मुद्दा नसल्याचे एका मुस्लीम धर्मीयाने दाखवून दिले आहे.गोवंशाचा मुद्दा समोर करून हा आपलाच ‘कॉपीराईट’ असल्याचा आविर्भाव आणणाऱ्या संघटनांना रायपूर येथील फैज खान यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे. गोवंश संवर्धनासाठी झटणारे फैज हे गेल्या वर्षभरापासून देशभरात भ्रमण करत आहेत. पदयात्रेच्या माध्यमातून गोसेवेचा संदेश देणाऱ्या फैज यांनी सामाजिक समरसतेचे उदाहरणच उभे केले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून गोसेवेचे कार्य करणारे फैज खान हे रायपूर येथे प्राध्यापक होते. मात्र गोसंवर्धनासाठी वाहून घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तेथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. काही वर्ष त्यांनी देशातील विविध भागात गोकथा ऐकविण्यासाठी भ्रमंती केली. नमाजने दिवसाची सुरुवात करणारे फैज खान दुपारी गोकथा ऐकवायचे. गोवंशाच्या मुद्यावरून देशातील बिघडते वातावरण लक्षात घेऊन त्यांनी गोवंशाचे महत्त्व व सामाजिक समरसतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी देशात पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला व २४ जून २०१७ रोजी लेह येथून यात्रेला सुरुवात केली. लेह ते कन्याकुमारी व त्यानंतर कन्याकुमारी ते अमृतसर अशी त्यांची ही यात्रा राहणार आहे. वर्षभरात फैज खान यांनी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड या राज्यांना भेटी दिल्या. सध्या ते महाराष्ट्रात असून नागपुरातदेखील त्यांनी लोकांची भेट घेतली. फैज खान हे आपल्या एकूण यात्रेदरम्यान १२ हजार किलोमीटरची पदयात्रा करणार आहेत. आतापर्यंत सुमारे ६ हजार किलोमीटर ते चालले असून पुढील वर्षी जूनपर्यंत त्यांची ही यात्रा चालणार आहे.

अशी मिळाली प्रेरणाप्राध्यापक म्हणून सरळसोपे आयुष्य जगण्याचा त्यांच्याकडे पर्याय होता. मात्र गिरीश पंकज यांनी लिहिलेले ‘गाय की आत्मकथा’ हे पुस्तक वाचून ते अस्वस्थ झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला गोसेवेला वाहून घेण्याचा निर्णय घेतला व याच संकल्पातून गोसेवा सद्भावना यात्रेला सुरुवात झाली. आपल्या यात्रेदरम्यान ते विविध ठिकाणी चौपाल लावतात व नागरिकांशी संवाद साधतात. सोबतच मोठ्या नद्यांचे पाणीदेखील ते आपल्या सोबत घेत आहेत. हे सर्व पाणी एकत्रित करून कन्याकुमारी येथे विसर्जित करणार आहेत.

गाय हा धर्माच्या पलीकडचा विषयगाय ही जगाची माता आहे. केवळ हिंदू किंवा मुस्लीम या धर्माचा हा विषय नाहीच. धर्माच्या पलीकडचा हा मुद्दा आहे. भारतीय देशी गोवंशाचे प्रमाण कमी होत आहे. त्याचे संवर्धन व्हावे हा माझा उद्देश आहे. यासाठी जनतेपर्यंत आरोग्य, पर्यावरण, समाज व संस्कृतीच्या दृष्टीने गोवंशाचे महत्त्व पोहोचले पाहिजे. माझ्या यात्रेचा हाच उद्देश आहे, असे फैज खान यांनी सांगितले. गाईच्या नावावर समाजात विद्वेष वाढविणे अयोग्य आहे, असे फैज खान यांनी सांगितले. गोहत्येवर देशभरात बंदी लावण्यासाठी केंद्रीय कायदा तयार करण्यासाठी ते आपल्या यात्रेदरम्यान लोकप्रतिनिधींच्या भेटीदेखील घेत आहेत.

टॅग्स :cowगाय