शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक टंचाईचा दुर्बल घटकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:43 IST

महापालिकेच्या स्थायी समितीचा अर्थसंकल्प सादर करून सहा महिने झाले. परंतु दुर्बल घटक समितीच्या ४४.६२ कोटींच्या निधीचे वाटप अद्याप सुरू झालेले नाही.

ठळक मुद्देनिधीचे वाटप रखडले : विकास कामांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीचा अर्थसंकल्प सादर करून सहा महिने झाले. परंतु दुर्बल घटक समितीच्या ४४.६२ कोटींच्या निधीचे वाटप अद्याप सुरू झालेले नाही. मागास भागातील विकास कामे करता यावी. यासाठी या निधीची तरतूद केली जाते.परंतु आर्थिक टंचाईमुळे हा निधी मिळालेला नाही. याचा फटका दुर्बल घटकांना बसला आहे.जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसातच पावसाळा सुरू झाल्याने विकास कामे थांबली. सोबतच नवीन कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया मंदावली. याचा या भागातील विकास कामांवर परिणाम झाला आहे. अर्थसंकल्पात मागासवर्गीयांचा राखीव निधी म्हणून ४४.६२ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून मागास व दुर्बल घटकांची संख्या अधिक असलेल्या भागातील प्राथमिक शाळा दुरुस्ती, उद्यानाचा विकास, बीएसयूपी घरकूल योजना, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या योजना, शौचालय, रस्ते, समाज भवन अशी विकास कामे केली जातात.मागासवर्गीय कल्याण समिती महत्त्वाची असूनही समितीचे कामकाज ठप्पच होते. काही दिवसापूर्वी सभापती महेंद्रप्रसाद धनविजय यांना कक्ष उपलब्ध झाला. अद्याप कामकाजाची गाडी रुळावर आलेली नाही. आर्थिंक टंचाईमुळे नगरसेवकांनी सादर केलेल्या प्रभागातील विकास कामांच्या फाईल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच मागासवर्गीय कल्यास समितीकडूनही निधी उपलब्ध होत नसल्याने नगरसेवक नाराज आहेत.कसा होणार विकासमागासवर्गीय भागातील विकास कामे व्हावी. यासाठी दुर्बल घटकांसाठी अर्थसंकल्पात ५ टक्के निधी राखीव ठेवला जातो. अर्थसंकल्पासोबतच या निधीला मंजुरी दिली जाते. परंतु अद्याप दुर्बल घटक निधीचे वाटप सुरू झालेले नाही. यामुळे शहरातील दुर्बल घटकांचा विकास कसा होणार असा प्रश्न मागासवर्गीयांना पडला आहे. उत्तर व पूर्व नागपुरात मागासवर्गीयांची सर्वाधिक संख्या आहे.सभागृहात मुद्दा गाजणारमागासवर्गींयांना हक्काचा निधी मिळत नसल्याने नगरसेवक नाराज आहेत. २० नोव्हेंबरला होणाºया सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती उत्तर व पूर्व नागपुरातील नगरसेवकांनी दिली. सर्वच पक्षातील नगरसेवकांची नाराजी विचारात घेता सभागृहात हा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.