शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

बाजारपेठांवर पितृपक्षाची छाया

By admin | Updated: September 14, 2014 01:08 IST

गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत आलेली तेजी आणि पुढच्या काळात निवडणुका असल्याने ती कायम राहण्याची आलेली संधी मधल्या काळातच आलेल्या पितृपक्षामुळे काही अंशी का असे ना ओसरली आहे.

उलाढाल मंदावली : ग्राहकांना नवरात्राची प्रतीक्षानागपूर : गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत आलेली तेजी आणि पुढच्या काळात निवडणुका असल्याने ती कायम राहण्याची आलेली संधी मधल्या काळातच आलेल्या पितृपक्षामुळे काही अंशी का असे ना ओसरली आहे. सर्वच बाजारपेठांमध्ये सध्याच्या काळात मंदीचे चित्र आहे. जग झपाट्याने बदलत असताना आणि त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा पगडा असताना जुन्या चालीरीतीवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या सध्या तरी कमी झालेली नाही. त्यामुळेच पितृपक्षाचा परिणाम बाजारपेठांमधील उलाढालीवर दिसून येत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. पितृपक्षाचा हा काळ वर्षानुवर्षे बाजाराला निषिद्ध का आहे, हे उमगत नसले तरी या काळात व्यवहार बंदच असतात. या पक्षात कोणताही मोठा व्यवहार होत नाही. जमीन, सोन्याची खरेदी-विक्री किंवा इतरही अनेक बाबी या काळात शुभ मानल्या जात नाहीत. फुलांच्या बाजारावर परिणामपितृपक्षाच्या अखेरीस फुलांचा बाजार मंदीतच असून नवरात्र सुरू होईपर्यंत हे भाव असेच राहणार आहेत. पितृपक्षात फुले कोमजलेलीच आहे. गणेशोत्सवात जितकी कमाई झाली त्याच्या काही पटीने या पंधरा दिवसांत तोटा झाला आहे. पितृपक्षात सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा प्रघात आहे. त्यामुळे फुलांचे नुकसान होत असून अगदीच मातीमोल भावाने फुले विकावी लागत आहेत . गणेशोत्सवात जी फुले ३०० रुपयांपर्यंत जाऊन ठेपली होती ती आज ८० रुपयांपर्यंत घसरली आहेत. तसे पाहता पितृपक्षात फुलांचा बाजार का मंदावतो हे गणित उलगडत नसल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीला ब्रेकगणेशोत्सवाच्या आनंदोत्सवासोबतच खरेदीचा आनंद पितृपक्षामुळे ओसरल्याचे चित्र शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूम्समध्ये दिसत आहे. या क्षेत्रातील खरेदी तब्बल ६० ते ७० टक्क्यांनी घटल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. अशा वातावरणामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांचेही डोळे नवरात्रोत्सवाकडे लागले आहेत. एलईडी, एलसीडी, फ्रीज, वॉशिंग मशीन्स, डीव्हीडी प्लेयर्सपासून ते डीटीएच विक्रेत्यांपर्यंत साऱ्यांनाच मंदीचा फटका बसतो आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने व शोरूम्समध्ये ग्राहकांची वर्दळ दिसत असली तरीही, प्रत्यक्षात ती केवळ ‘वॉकिंग’ अर्थात एखादे प्रॉडक्ट पाहून ते निश्चित करून जाणे हाच हेतू असतो. दसऱ्यापर्यंत मंदी कायम राहणार असल्याने व्यावसायिक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. दसरा ते दिवाळीदरम्यान मुहूर्त कॅश करण्याची व्यावसायिकांनी तयारी सुरू केली आहे.आॅटोमोबाईल क्षेत्रातही मंदीपितृपक्षाचा फटका आॅटोमोबाईल क्षेत्राला बसला आहे. दुचाकी, चारचाकी, स्कूटर आणि व्यावसायिक वाहनांच्या खरेदीला ब्रेक लागला आहे. बहुतांश गाड्यांची नोंदणी करून डिलिव्हरी नवरात्रोत्सवात घेण्याची प्रत्येकाची तयारी आहे. वाहनांची निवड करण्याची हीच खरी वेळ असल्याचे ग्राहकांचे मत आहे. त्याच कारणांमुळे बहुतांश शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे. दसरा आणि दिवाळीत वाहन घरी नेण्यासाठी अनेकांचा बुकिंगवर भर असल्याचे आॅटो शोरूमच्या संचालकांनी सांगितले. कापड बाजार ‘फिफ्टी-फिफ्टी’पितृपक्षात फटका बसणारा मोठा घटक म्हणून कापड व्यवसाय ओळखला जातो. जुन्या रूढी आणि परंपरेनुसार पितृपक्षात नवीन कपडे खरेदी केले जात नाहीत. त्यामुळेच पंधरवड्यात कापड व्यवसायावर बऱ्यापैकी परिणाम होतो. यंदा मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. पितृपक्षातील फटका लक्षात घेत रेडिमेड व्यावसायिक विविध स्कीम्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. शहरातील शॉपिंग मॉलमधील स्कीम्समुळे कपड्यांची बऱ्यापैकी उलाढाल होत आहे. पितृपक्षानंतर येणारी लग्नसराईदेखील कारणीभूत मानली जाते. अनेकांनी पितृपक्षानंतर दरवाढ होण्याचा धसका घेत त्यापूर्वीच लग्नाची खरेदी केली आहे. दुकानदारही जुना स्टॉक क्लिअरन्सवर भर देतात. त्यामुळे बाजारात नवीन व्हेरायटी दिसून आल्या नाहीत. साधारण नवरात्रीच्या तीन ते चार दिवस आधी नवीन माल मागवला जातो. यात नवरात्री व दसऱ्याची खरेदी डोळ्यासमोर ठेवून माल भरला ातो. सोन्याला उठाव कमीपितृपक्षात शुभ कार्य होत नाही व नवीन वस्तूंची खरेदीही केली जात नाही. त्याचा प्रतिकूल परिणाम सराफा बाजारावर झाला असून सोन्याच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाली आहे. साधारणत: ५० टक्क्यांहून अधिक सोन्याची मागणी घटली आहे. नवरात्र उत्सवासाठी लागणाऱ्या दागिन्यांची आॅर्डर मात्र सध्या दिली जात असून बुकिंगला प्राधान्य आहे. यंदा सोन्याची बुकिंग कमी भावात होते. मात्र ग्राहक सोने घरी नेत नाहीत. भाव कमी असतानाही सराफा बाजारात उत्साह नसल्याचे सराफा व्यावसायिक पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले. बांधकामे जोरातबिल्डर्सनी दिलेल्या आश्वासनानुसार बांधकामे पूर्ण करण्याकडे कल असल्याने शहरातील सर्वच ठिकाणी बांधकाम जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीत घरांचा ताबा देण्यासाठी अनेक बिल्डर्संनी बांधकामाला वेग दिला आहे. शहरात रिअल इस्टेट क्षेत्र जोरात असल्याने शहराच्या विविध भागात अनेक बांधकाम प्रकल्पांचे काम वेगात आहे. (प्रतिनिधी)