शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या वडिलांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:44 IST

संपूर्ण कुटुंबाची वाताहत होऊनही व्यसन सोडायला आणि वर्तन सुधारायला तयार नसलेल्या एका व्यक्तीला त्याच्या लहान मुलानेच ठार मारले. संतोष प्रेमलाल बेनीबागडे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याची हत्या केल्यानंतर त्याचा लहान मुलगा आरोपी सचिन (वय २१) याने स्वत:च पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना नगरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देनागपूरच्या आराधनानगरातील थरारआरोपी मुलाने केले पोलिसांकडे आत्मसमर्पण : नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटर्वकनागपूर : संपूर्ण कुटुंबाची वाताहत होऊनही व्यसन सोडायला आणि वर्तन सुधारायला तयार नसलेल्या एका व्यक्तीला त्याच्या लहान मुलानेच ठार मारले. संतोष प्रेमलाल बेनीबागडे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याची हत्या केल्यानंतर त्याचा लहान मुलगा आरोपी सचिन (वय २१) याने स्वत:च पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना नगरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली.मृत संतोष बेनीबागडे याला दारूचे भारी व्यसन होते. रोज दारू पिऊन आल्यानंतर तो घरात आदळआपट करून घरच्या सदस्यांना मारहाण करायचा. मोठमोठ्याने ओरडून तो घरातील साहित्यही फेकत होता. वारंवार समजावूनही त्यात फरक पडत नसल्यामुळे घरच्यांसोबत शेजाऱ्यांसाठीही संतोष डोकेदुखीचा विषय बनला होता. त्यामुळे त्याचे शेजाऱ्यांसोबतही पटत नव्हते. त्याच्या या वृत्तीला कंटाळून त्याची पत्नी सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेली होती. मोठा मुलगा मनोज (वय २६) आणि लहान मुलगा सचिन कारपेंटरचे काम करून घर चालवित होते. नुसती दारू पिऊन रात्रंदिवस गोंधळ घालणाऱ्या संतोषला काही देणे-घेणे नव्हते. शुक्रवारी दुपारी मनोजच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे दोन्ही भावांची धावपळ सुरू असताना रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सचिन घरी आला. तिकडे दारूच्या नशेत टुन्न होऊन आलेला संतोष त्याच्या घरात गोंधळ घालू लागला. रात्री ११ च्या सुमारास त्याने घरात फेकफाक सुरू केली. सचिनने विरोध केला असता त्याला संतोषने मारहाण केली. त्यामुळे रागाच्या भरात सचिनने त्याच्या हातातून स्टीलचा रॉड हिसकावून घेत त्याच्या डोक्यावर फटका मारला. एकाच फटक्यात संतोष खाली कोसळला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे पाहून सचिनने त्याला उचलून डॉक्टरकडे नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, तो निपचित पडला होता. शेजाऱ्यांनी तो मृत झाल्याचे सचिनला सांगितले. त्यानंतर नंदनवन पोलिसांना शेजाऱ्याने माहिती दिली. आपल्या हातून जन्मदात्याची हत्या झाल्याने अस्वस्थ झालेला सचिन स्वत:च पोलीस ठाण्याकडे निघाला. वाटेत त्याला पोलिसांचे वाहन दिसताच त्याने ते थांबवून गुन्ह्याची माहिती देत स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले.नशिबाची थट्टा !या घटनेतून नशिबाने बेनीबागडे परिवाराची कशी थट्टा मांडली ते पुढे आले. वडिलांच्या वर्तनामुळे अवघे बेनीबागडे कुटुंबीयच त्रस्त झाले होते. सचिन आणि मनोजची आई त्यांना सोडून गेली होती. शुक्रवारी गर्भवती पत्नीची प्रकृती बिघडल्याने तिला त्याने रुग्णालयात दाखल केले. रात्री तो रुग्णालयात धावपळ करीत असताना लहान भावाच्या हातून वडिलांची हत्या घडल्याचे कळाल्याने तो पत्नीला सोडून घराकडे धावत आला. नंदनवन पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली. दारुड्या वडिलांची हत्या केल्याचे त्याने तक्रारीत नमूद केल्यामुळे लहान भाऊ सचिन याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून कोठडीत टाकले. तो कोठडीत, पत्नी रुग्णालयात असताना मनोजवर मृत वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी धावपळ करण्याची वेळ आली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून