शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडील ‘दंडार’ करायचे, मी तेंदूपत्ता तोडायचो! प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 21:50 IST

चटके सोसणाऱ्या गरिबीतच जन्म झाला. रोजीरोटीसाठी वडील राबायचे, त्यांना कला अवगत होती. ते ‘दंडार’ करायचे. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून मीसुद्धा मिळेल ते काम करायचो. तेंदूपत्ताही तोडायचो. वडिलांची कला माझ्यात अवतरली, मीदेखील शाळेपासून नाट्यवेडा झालो. मी स्वत: लिहित नाही तर तुम्ही मला लिहायला भाग पाडता, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी कारगाव येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना केले.

ठळक मुद्देकारगाववासीयांनी केला हृद्य सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (भिवापूर ) : चटके सोसणाऱ्या गरिबीतच जन्म झाला. रोजीरोटीसाठी वडील राबायचे, त्यांना कला अवगत होती. ते ‘दंडार’ करायचे. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून मीसुद्धा मिळेल ते काम करायचो. तेंदूपत्ताही तोडायचो. वडिलांची कला माझ्यात अवतरली, मीदेखील शाळेपासून नाट्यवेडा झालो. मी स्वत: लिहित नाही तर तुम्ही मला लिहायला भाग पाडता, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी कारगाव येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना केले.कारगाव ग्रामपंचायत व धम्म मैत्रेय संघाच्यावतीने भिवापूर तालुक्यातील कारगाव येथे प्रेमानंद गज्वी यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती प्रेमानंद गज्वी, त्यांच्या पत्नी उमाताई गज्वी, रमेश डेकाटे, वैशाली डेकाटे, माजी सभापती तुलाराम गजभिये, काव्यकार इ. मो. नारनवरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.पुढे बोलतांना गज्वी यांनी कारगाव येथे जागा उपलब्ध झाल्यास वाचनालय उभे करण्याचा मनोदय व्यक्त केला. शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे. स्पर्धा परीक्षेतून ग्रामीण भागातील युवकांना घडविण्याचा संकल्प व्यक्त करत ‘जे पेराल तेच उगवेल’ असे सांगितले. गावातील तेलीपुरा, कुणबीपुरा, बौद्धपुरा यांना एकत्र करून आपल्याला एक ‘गावपुरा’ करायचा आहे. ज्यामुळे जातीभेद नष्ट होतील. काम करायची इच्छा असेल तर यश हमखास पदरात पडते, असेही ते म्हणाले. इतर मान्यवरांनीही आपल्या मार्गदर्शनात प्रेमानंद गज्वी यांचे कारगाव येथील बालपण ते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास कथन केला.जन्म पिंपळगाव अन् बालपण कारगावप्रेमानंद गज्वी यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला. मात्र बालपण भिवापूर तालुक्यातील कारगाव येथेच गेले. प्राथमिक शिक्षण घेताना शाळेतील शिक्षकांसोबत नाटकात काम करायचे... वडिलांचे कलागुण आणि शिक्षकांचे नाट्यप्रेम यातून प्रेमानंद गज्वी यांच्यातला नाटककार जन्माला आला. माध्यमिक शिक्षण उमरेड येथील जीवन विकास विद्यालयात झाले. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

टॅग्स :Natakनाटकliteratureसाहित्य