शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बाप परिस्थितीपुढे वाकला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

मनगटात ताकद होती, कुणापुढे पसरले नाही हात : कोरोनाच्या परिस्थितीत आणि महागाईत आठ-दहा हजारात कुटुंब पोसणारा बापही ग्रेट नागपूर ...

मनगटात ताकद होती, कुणापुढे पसरले नाही हात :

कोरोनाच्या परिस्थितीत आणि महागाईत आठ-दहा हजारात कुटुंब पोसणारा बापही ग्रेट

नागपूर : कोरोना आला अनेकांच्या हातचा रोजगार हिरावून गेला. कामे बंद पडली म्हणून मजुरांनी गावोगावी पलायन केले. पण या शहरात राहणारा मजूर येथेच थांबला. त्याच्यावरही उपासमारीची वेळ आली. त्याच्या मुलांचेही शिक्षण थांबले. स्वत:बरोबर कुटुंबाच्याही आरोग्याची चिंता त्याला भेडसावत होती. या भीषण परिस्थितीपुढे तो मजूर बापही खचला. पण, परिस्थितीशी झुंजला आपल्यावर अवलंबून असलेल्या बायको आणि लेकरांच्या पोटासाठी बाहेर पडला. मनगटात ताकद होती म्हणून वाटेल ते काम केले. मात केली या महागाईच्या काळात कोरोनाच्या परिस्थितीवर. आज फादर्स डे, कष्ट करून आठदहा हजाराच्या मिळकतीत, आपले कुटुंब पोसून मुलाबाळांचे भविष्य उज्वल करणारे असे अनेक बाप आहेत आणि हे सर्वच ग्रेट आहेत. असाच एक ग्रेट बाप बेझनबागेतील लुंबिनीनगरात राहतो.

प्रदीप रामटेके असे त्याचे नाव. गेल्या १५ वर्षापासून तो पेंटिंगचे काम करतो. सध्या त्याला दिवसाला ३५० रुपये रोज मिळतो. या मिळकतीवर तो दोन मुलं, पत्नी यांचे दोन वेळी पोट भरून मुलांचे शिक्षण पूर्ण करतो. सरकारी रेशन हे त्याच्या उत्पन्नाव्यतिरिक्त मिळालेला आधार. प्रदीपची मुलगी दहावीत आणि मुलगा सहावीत आहे. पेंटिंगचे कामही रोज नसतेच. दोन कामे जास्त करून तो कुटुंब पोसत होता. पण गेल्यावर्षी कोरोना आला. सरकारने लॉकडाऊन लावले आणि मिळणारी कामे बंद झाली. सुरुवातीचे दोन महिने तर अख्खे सर्व घरातच. रेशनचे धान्य आणि जवळ असलेला तेलमीठासाठीचा पैसा यात गुजराण केली. बाहेर पडलो तर कोरोनाची भीती आणि घरात उपासमारीची. कोरोनापेक्षा उपासमारी जास्त वेदनादायक म्हणून प्रदीप घराबाहेर पडला. पेंटिंगची कामे नव्हती म्हणून हातठेला घेऊन भाजीपाला विकला. भाजीपाला विकून कसेबसे कुटुंब जगविले. या दरम्यान सण सोहळे मागे सोडले. कुटुंबाची आजारपणे, मुलांचे शिक्षण यात तडजोड केली नाही. आता दोन आठवड्यापूर्वी त्याला पुन्हा पेंटिंगचे काम मिळाले आहे.

- महागाईने अजून जगणे असहाय्य केले

३०० ते ३५० रुपये रोजी. दररोज कामसुद्धा मिळत नाही. कसेबसे ६ ते ७ हजार रुपये घरात येतात. स्वत:चे घर आहे हा एवढाच आधार. पण घरखर्च वाढला आहे. सिलेंडरसाठी ९०० रुपये द्यावे लागलात. कितीही बचत केली तरी वीज बिल ८०० रुपयांच्या घरात येतेच. खाद्यतेल आज १७० रुपये झाले आहे. डाळी, साखर अशा सर्वच वस्तू वाढल्या आहे. आपले दुखणे आपण घरातच छोटेमोठे उपचार करून टाळतो. पण मुलांचे टाळता येत नाही. त्यांचे शिक्षण आहे. शाळेने मुलीची पूर्ण फी भरायला लावली. दहावीत गेल्यामुळे ट्युशनचा खर्च आहे. मुलगा सहावीत आहे. शाळा बंद असल्या तरी शिक्षणाचा छोटामोठा खर्च लागतोच. घरातल्या एका कमावत्या व्यक्तीला हे सर्व करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. पण जगायचे आणि जगवायचे आहे, बापाचे कर्तव्य पूर्ण करायचे आहे, असा प्रदीप बोलून जातो.