शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बापलेकांनी मिळून केली तरुणाची हत्या; नागपुरातील मानकापूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:57 IST

जुन्या वादातून एका तरुणाची बाप व लेकाने मिळून हत्या केल्याची घटना येथे शनिवारी पहाटे घडली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीहरीनगरात परिसरात मंगेश श्रावण खोटे (२७)याचा मृतदेह आढळून आला.

ठळक मुद्देएकमेकांना शिवीगाळ करण्यावरून वाद वाढत गेला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जुन्या वादातून एका तरुणाची बाप व लेकाने मिळून हत्या केल्याची घटना येथे शनिवारी पहाटे घडली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीहरीनगरात परिसरात मंगेश श्रावण खोटे (२७)याचा मृतदेह आढळून आला.मंगेश खोटे आणि आरोपी लोणारे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी राजकुमार लोणारे याने मंगेशच्या घरी जाऊन त्याला शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली होती. राजकुमारचा मुलगा जॉकी यानेही शुक्रवारी मंगेशला शिवीगाळ केली होती. परिणामी संतप्त मंगेश व त्याच्या आईने, पुष्पा खोटेने (५३) लोणारे बापलेकाला त्याचा जाब विचारला. त्यावेळीही या दोघांनी मंगेश व त्याच्या आईला शिवीगाळ करीत धमक्या दिल्या होत्या. या घटनेनंतर मंगेश व त्याची आई घरी परत गेल्यानंतर मंगेशने रात्री ७ च्या सुमारास आरोपीच्या घरी जाऊन येतो असे सांगितले व तो घरातून निघून गेला. पुष्पा खोटेने त्याला रोखले मात्र त्याने तिचे ऐकले नाही. मध्यरात्र उलटूनही तो परत आला नाही म्हणून पुष्पा खोटेने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला व पोलिसांना कळवले. पोलिसांनी शोध घेतला असता पहाटे ४ च्या सुमारास मंगेश श्रीहरीनगरात मृतावस्थेत आढळला. आरोपी जॉकी व त्याचे वडील राजकुमार लोणारे या दोघांनी त्याला दगड आणि लाकडी फळीने ठेचून मारल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले. पोलिसांनी पुष्पा खोटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Murderखून