शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती रोडवर जीवघेणा प्रवास : दररोज होतात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:55 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका वाहनचालकांना बसतो आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका वाहनचालकांना बसतो आहे.नागपूर शहरात सर्वात जास्त वाहन आणि प्रवासी अमरावती महामार्गातून नागपुरात प्रवेश करतात. अमरावतीपासून नागपूरच्या वाडीपर्यंतचा चार पदरी महामार्ग उत्कृष्ट आहे. मात्र, वाडीमधून नागपूर महापालिकेच्या हद्दीत हा महामार्ग येताच त्यावर खड्ड्यांची मालिकाच सुरू होते. गेल्या काही महिन्यात या रस्त्यावर अनेक वाहनचालकांचा अपघात होऊन ते जखमी झाले आहे. काहींना जीव ही गमवावा लागला आहे. विद्यापीठ कॅम्पसपासून वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर कुठेही रात्रीची विद्युत व्यवस्था नसल्याने आणि दुभाजकाची निर्मिती अशास्त्रीय पद्धतीची असल्याने रात्रीच्या वेळी महामार्गाचा हा टप्पा वाहनचालकांना जणू यमराज सारखाच भासतो. एक महिनापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने अमरावती महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. विद्यापीठ कॅम्पसकडून वाडी नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्ध्या पट्याचे डांबरीकरण केले. अर्ध्या डांबरीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध उंचसखल भाग तयार झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या दुचाकी त्यावरून घसरून अपघात होत आहे. रात्रीच्या वेळेला दुचाकी घसरून वाहनचालक जखमी झाले आहे. आठवड्याभरापूर्वी पोस्टल कॉलनी समोर एका दाम्पत्याचा असाच अपघात होऊन महिलेच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. दोन दिवसांपूर्वी हॉटेल हायवे ग्लोरीसमोर दुचाकी रस्त्याच्या उंचसखल भागावरून घसरल्याने दोघे जण जखमी झाले.महापालिकेने काही आठवड्यापूर्वी या महामार्गावर विद्यापीठ कॅम्पसपर्यंत दुभाजकावर रिफ्लेकटर लावले. मात्र, त्यापुढच्या टप्प्यात अत्यंत धोकादायक दुभाजकाला रिफ्लेकटर न लावताच तसेच सोडून दिले.वाडी, दत्तवाडी, डिफेन्स, आठवा मैल, गोंडखैरी, लावा दवलामेटी अशा परिसरातून रोज हजारो लोक शहरात येतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे त्या सर्वांना रोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीroad safetyरस्ते सुरक्षा