शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतक-यांना रब्बी हंगामातील हरभरा पेरणी तंत्रज्ञानाचे धडे!

By admin | Updated: October 31, 2016 23:33 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे अनुदान; बीजोत्पादनावर देणार भर.

अकोला, दि. ३१- रब्बी हंगामातील हरभरा पिकावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले असून, विदर्भातील शेतकर्‍यांना शेतावर जाऊन हरभरा लागवड तंत्रज्ञान समजावून सांगितले जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत यावर्षी या उपक्रमासाठी अनुदान उपलब्ध करण्यात आले असून, हरभरा बीजोत्पादनावर अधिक भर दिला जाणार आहे.येत्या हंगामात या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विदर्भात प्रकल्प राबविण्यात येत आहे. याची सुरुवात अकोला तालुक्यातील कापशी, म्हैसपूर, वाशिंबा व सोनाळा येथून करण्यात आली आहे. हरभर्‍याचे भरघोस उत्पादन व्हावे, तद्वतच शेतकर्‍यांनी शेतावरच दज्रेदार बियाणे उत्पादन घ्यावे, यासाठी या गावातील शेतकर्‍यांना हरभरा पेरणी तंत्रज्ञानावर प्रशिक्षण दिले जात आहे. विदर्भातील कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र ह्यहरभरा लागवड तंत्रज्ञानह्ण या विषयावर एका दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.पी.जी. इंगोले यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमात कृषी अधिकार्‍यांसह डॉ. विकास गौड, डॉ. प्रेरणा चिकटे, अर्चना चव्हाण शेतकर्‍यांना हरभरा पेरणी तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देत आहेत.दरम्यान, पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे मागील चार ते पाच वर्षांंपासून रब्बी हरभरा पिकाचे उत्पादनावर सारखा प्रतिकूल परिणाम होत असल्याने यावर्षी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला हरभरा बियाणे मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली. शेवटी हैदराबाद येथून एक लाख क्विंटल बियाणे महाबीजला मिळाले. पण, हेही बियाणे कमी पडत असल्याने शेतकर्‍यांना अनुदानावरील बियाणे मिळणे कठीण झाले आहे.या पृष्ठभूमीवर यावर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बी पिकांसाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे यावर्षी भरघोस उत्पादन घेता यावे, याकरिता शेतकर्‍यांना पेरणी तंत्रज्ञानाची माहिती प्रशिक्षणातून दिली जात असून, शेतकर्‍यांनी स्वत:चा दज्रेदार बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यावर भर दिला जात आहे.शेतकर्‍यांनी चांगले दज्रेदार उत्पादन घ्यावे, याकरिता शेतकर्‍यांना हरभरा पेरणी तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जात आहे. तद्वतच कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विदर्भात प्रकल्प राबविण्यात येत आहे.डॉ. प्रदीप इंगोले,संचालक विस्तार शिक्षण,डॉ. पंजाबराव देशममुख कृषी विद्यापीठ, अकोला.