‘ड्रॅगनफ्रूट’लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:42+5:302021-07-25T04:08:42+5:30

कळमेश्वर: ड्रॅगनफ्रूट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातील फळ आहे. या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि अ‍ॅन्टीऑक्सीडंन्टमुळे ...

Farmers should turn to ‘dragonfruit’ cultivation | ‘ड्रॅगनफ्रूट’लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळावे

‘ड्रॅगनफ्रूट’लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळावे

Next

कळमेश्वर: ड्रॅगनफ्रूट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातील फळ आहे. या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि अ‍ॅन्टीऑक्सीडंन्टमुळे या फळास अधिक मागणी आहे. तसेच या फळात विविध औषधी गुण आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रूट लागवडीकडे वळावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमाकांत हातांगळे यांनी केले. या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शियम या सारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. तसेच या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य आहे. पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मूल्य या बाबी लक्षात घेता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. ड्रॅगनफ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पध्दत, ठिंबक सिंचन, खते व पिक संरक्षण याबाबीकरीता अनुदान देय आहे. याकरिता ४ लाख प्रकल्पमूल्य ग्राह्य धरून ४० टक्के प्रमाणे १.६० लाख अनुदान तीन वर्षात देण्यात येत असल्याची माहिती हातांगळे यांनी दिली.

Web Title: Farmers should turn to ‘dragonfruit’ cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.