शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज- बाळासाहेब थोरात
By मंगेश व्यवहारे | Published: December 13, 2023 11:04 AM2023-12-13T11:04:26+5:302023-12-13T11:04:44+5:30
शासकीय संस्थांमध्ये स्वत:चा हस्तक्षेप वाढवीत आहे. त्याचे परिणाम चुकीचे आहेत असंही थोरात यांनी सांगितले.
नागपूर : अधिवेशनाचे पाच दिवस लोटले आहेत. पण, सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. अतिवृष्टीमुळे लहान कास्तकारांचे कंबरडे मोडले आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान वर्षभरही भरून निघू शकणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना मदत नको तर भरीव मदतीची गरज आहे, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.
राज्यसभेत निवडणूक आयोगाच्या नियुक्तीबाबतचे विधेयक मंजूर झाले आहे. यावर बोलताना थोरात म्हणाले की, सरकार सर्वच सहकारी संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये स्वत:चा हस्तक्षेप वाढवीत आहे. त्याचे परिणाम चुकीचे आहेत. .