शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

को-मार्केटिंग बंदीमुळे शेतकरी स्वस्त कीटकनाशकांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 11:51 IST

राज्य सरकारने को-मार्केटिंग/को-ब्रँडिंग अमान्य केल्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त कीटकनाशके मिळण्याची शक्यता मावळली आहे. सुदैवाने फॉस्फेटिक खते बनवणाऱ्या एका कंपनीने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे व निकालाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देमामला कोर्टात, निकालाची प्रतीक्षा

सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने को-मार्केटिंग/को-ब्रँडिंग अमान्य केल्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त कीटकनाशके मिळण्याची शक्यता मावळली आहे. सुदैवाने फॉस्फेटिक खते बनवणाऱ्या एका कंपनीने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे व निकालाची प्रतीक्षा आहे.

को-मार्केटिंग काय आहे ?बहुतांश मोठ्या कंपन्या कीटकनाशके/खते स्वत:च्या ब्रँडने तयार करतात व डिस्ट्रिब्युटर-डिलर मार्फत बाजारात विकतात. बरेचदा यापैकी मोठे डिस्ट्रिब्युटर मोठ्या कंपन्यांना तेच कीटकनाशक/खत (रासायनिक मिश्रण) स्वत:च्या ब्रँडने उत्पादन करून देण्यास सांगतात. त्याप्रमाणे मोठ्या कंपन्या डिस्ट्रिब्युटरच्या ब्रँडने तेच कीटकनाशक/खत बनवून देतात. याला बाजारात को-मार्केटिंग किंवा को-ब्रँडिंग म्हणतात.

डिस्ट्रिब्युटर्स असे का करतात?बहुतेक मोठ्या कंपन्या भारतभर व्यवसाय करतात म्हणून त्यांचा आस्थापना खर्च व वितरण खर्च खूप जास्त असतो व त्यांचा भार शेवटच्या ग्राहकावर म्हणजे शेतकऱ्यावर पडत असतो.याउलट डिस्ट्रिब्युटरचे वितरण छोट्या क्षेत्रापुरते मर्यादित असते. त्यामुळे त्याचा आस्थापना व इतर खर्च तुलनात्मक कमी असतो. त्यामुळे डिस्ट्रिब्युटर मोठ्या कंपन्यांचे कीटकनाशक/खत स्वत:च्या ब्रँडने शेतकऱ्यांना विकू शकतो. बाजारातील सूत्रांच्या मते ब्रँडेड आणि को-ब्रँडेड उत्पादनाच्या किमतीतील तफावत २० ते २५ टक्के असते.

को-मार्केटिंगवर बंदी कशी आली?या क्षेत्रातील सूत्रांच्या मते सरकारने डिस्ट्रिब्युटरजवळ मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नसते म्हणून त्याला को-ब्रँडेड कीटकनाशके विकता येणार नाहीत असा फतवा काढला आणि याच निर्णयाला उच्च न्यायालयात एका खत कंपनीने आव्हान दिले आहे.सुनावणीदरम्यान कोर्टाने कंपनीच्या बाजूने कल दर्शवला होता पण सरकारने त्याला आव्हान दिले. त्यामुळे पुढील सुनावणी २१ जून २०१८ ला होणार आहे व निकालाची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत.यासंबंधी संपर्क केला असता कृषी आयुक्त शचिन्द्र प्रताप सिंह यांनी चेंडू कृषी संचालक व्ही.बी. इंगळे यांचेकडे टोलवला. ‘को-मार्केटिंगवर बोलण्यासाठी श्री. इंगळे हे योग्य व्यक्ती आहेत’ असे सिंह म्हणाले.इंगळे यांनी मात्र आपण १ जूनपासून पदभार स्वीकारला असून मामला कोर्टात असल्याने बोलण्यास नकार दिला.त्यामुळे जर को-ब्रँडिंग/को-मार्केटिंग उत्पादनांवरील बंदी कायम राहिली तर शेतकऱ्यांना महाग ब्रँडेड कीटकनाशके घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही व त्यासाठी २० ते २५ टक्के अधिक रक्कम द्यावी लागेल आणि याचा फटका ४० लाख गाठी पिकवणाऱ्या विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार हे स्पष्ट आहे.प्रिन्सिपल सर्टिफिकेटप्रत्येक मोठ्या कंपनीजवळ कीटकनाशके उत्पादन करण्याचे लायसेन्स (मॅन्युफॅक्चरिंग लायसेन्स) असते. या कंपन्या प्रत्येक ब्रँडेड व को-ब्रँडेड कीटकनाशकासोबत एक प्रिन्सिपल सर्टिफिकेट देतात. या सर्टिफिकेटची एक प्रत डिस्ट्रिब्युटर ते डिलरपर्यंत वापरली जाते. याचबरोबर डिस्ट्रिब्युटर व डिलरला सुद्धा कीटकनाशके साठवणूक वाहतूक व विक्री करण्याचे लायसन्स घ्यावे लागते.

टॅग्स :Farmerशेतकरी