शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीसुद्धा लढू शकतील बाजार समितीची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 07:45 IST

विधानसभेत सुधारित विधेयकाला मंजुरी; माल विकण्याच्या नियमातही दुरुस्ती

नागपूर : आता मतदार नसलेल्या शेतकऱ्यांना थेट कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविता येणार आहे. याबाबतच्या सुधारित विधेयकाला मंगळवारी विधानसभेत मंजुरी देण्यात आली. पणनमंत्री दादा भुसे यांनी हे विधेयक मांडले होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नव्हती.  कृषी सहकारी सोसायटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांनाच ही निवडणूक लढण्याचा अधिकार होता. याचा विचार राज्य सरकारने केला. शेतकऱ्यांना थेट निवडणूक लढता यावी. यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. आता कोणत्याही शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढता येईल. यासाठी त्याला  कृषी सहकारी सोसायटीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांना सूचक व अनुमोदक म्हणून बनवावे लागतील. सूचक व अनुमोदक असलेल्यांना ही निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. 

काही शेतकरी आपला कृषी माल  आपल्या तालुक्यातील बाजार समितीत विकत नाहीत. अशा परिस्थीतीत त्यांना आपल्या तालुक्यात निवडणूक लढण्याची संधी कशी देता येईल. याचा विचार करता सरकारने असा नियम बनवावा की, जो शेतकरी कमीतकमी तीन वर्षे आपल्या तालुक्यातील बाजार समितीत माल विकत असेल अशाच शेतकऱ्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली. ही सूचना चांगली आहे. नियम बनविताना याचाही समावेश केला जाईल. अशी ग्वाही भुसे यांनी दिली. 

विधेयकावरील चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, भाजपचे संजय कुंटे, हरिभाऊ बागडे यांच्यासह अन्य सदस्य चर्चेत सहभाग घेताना म्हणाले, शेतकऱ्यांना थेट निवडणूक लढण्याची संधी देऊन राज्य सरकार कृषी उत्पन्न बाजार समितीत आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन