शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

शेतकरी उगारणार सरकारवर ‘आसूड’

By admin | Updated: April 12, 2017 02:03 IST

सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक नफा मिळवून देऊ अशी वचने दिली होती.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करानागपूर : सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक नफा मिळवून देऊ अशी वचने दिली होती. परंतु एकहाती सत्ता आल्यानंतर सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. आम्ही शेतकऱ्यांचे नाहीच अशा अविर्भावात सरकार वागत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत गल्लीतून दिल्लीपर्यंत सारखीच उत्तरे मिळत आहे. बैलाला वठणीस आणण्यासाठी जसा शेतकरी त्यांच्यावर आसूड उगारतो, तसेच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सरकार शेतकऱ्यांचे ऐकत नसल्यामुळे शेतकरी सरकारवर आसूड उगारणार असल्याची भावना प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत ही आसूड यात्रा प्रहार व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आली आहे. ११ दिवसांच्या यात्रेला आमदार निवासातून सुरुवात झाली. बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात आसूड यात्रा नागपूरमार्गे वर्धेकडे निघाली आहे. यात्रेत राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार शर्मा, राष्ट्रीय किसान युनियनचे हरियाणाचे गुरुनामसिंग सहभागी झाले आहेत. यात्रेत विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. ११ दिवस ही यात्रा महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदूरबार असा प्रवास करीत गुजरात येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या जन्मगावी २१ एप्रिलला पोहचणार आहे. यात्रेच्या समापनाला हजारो शेतकरी व मृत शेतकऱ्यांच्या विधवा रक्तदान करून ‘शेतकऱ्यांचे रक्त घ्या, जीव घेऊ नका’ असा संदेश सरकारला देणार आहे. (प्रतिनिधी)देशभरातील शेतकऱ्यांचा दिल्लीत घेरावदेशभरातील शेतकरी हा केवळ कर्जमुक्ती व लागत मूल्यापेक्षा अधिक हमीभाव यासाठी लढतो आहे. देशभरातील शेतकऱ्यांचा हा लढा जानेवारी २०१८ मध्ये दिल्लीत पोहचणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या ६० संघटना एकत्र येऊन, शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत पोहचविणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून निघालेली आसूड यात्रा सरकारवर दबाव वाढविण्याचा एक भाग आहे. -शिवकुमार शर्मा, अध्यक्ष, राष्ट्रीय किसान मजदूर संघआसूड यात्रेतून सरकारकडे मागण्यास्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी तातडीने लागू करा.राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करा.पेरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेमार्फत जाहीर करा.सर्व शेतमालावरील निर्यातबंदी हटवा.शहराप्रमाणे गावातील नागरिकांना घरकूल योजनेचा लाभ द्या. अपंग, विधवा महिला यांना दारिद्र्य रेषेची आणि उत्पन्नाची अट न ठेवता अंत्योदय योजना आणि घरकूल योजनेचा लाभ द्या.अपंग, विधवा यांना ५००० रुपये प्रतिमाह मानधन द्या.