शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

By admin | Updated: July 8, 2017 02:22 IST

शेतात निंदण करीत असलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने झडप मारत हल्ला चढविला. वाघाने तिला पकडून तब्बल दीड कि.मी.पर्यंत जंगलात फरफटत नेले.

वेळगाव शिवारातील घटना : दीड कि.मी.पर्यंत नेले फरफटत लोकमत न्यूज नेटवर्क मांढळ : शेतात निंदण करीत असलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने झडप मारत हल्ला चढविला. वाघाने तिला पकडून तब्बल दीड कि.मी.पर्यंत जंगलात फरफटत नेले. ही घटना उमरेड कऱ्हांडला अभयारण्यांतर्गत येणाऱ्या कुही तालुक्यातील वेळगाव शिवारात शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वेळगाव परिसरात दहशत निर्माण झाली असून, नुकसानभरपाईच्या मागणीसाठी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पार्वती राजेराम परतेकी (५५, रा. वेळगाव, ता. कुही) असे मृत महिलेचे नाव आहे. पार्वती परतेकी यांची वेळगाव शिवारात शेती असून, हा भाग उमरेड कऱ्हांडला अभयारण्यांतर्गत येतो. ती शुक्रवारी सकाळी मुलगा आणि सुनेसोबत शेतात धानाच्या पऱ्ह्याचे निंदण करण्यासाठी गेली होती. दुपारच्या सुमारास मुलगा आणि सून पाणी पिण्यासाठी थोडे दूर गेले असता, झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप मारून तिला पकडले. हा प्रकार लक्षात येताच दोघांनीही तिला वाघाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघ चवताळला असल्याने त्यांना काही करणे शक्य झाले नाही. त्यातच परिसरातील शेतकरी व गुराखी गोळा झाले. त्यांनीही प्रयत्न केले परंतु यश आले नाही. त्यातच वाघाने पार्वतीला दीड कि.मी.पर्यंत फरफटत जंगलात नेले. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच अंदाजे २०० ग्रामस्थ जंगलात गेले. मोठ्या प्रयत्नानंतर वाघाने तिला सोडून पळ काढला. माहिती मिळताच एसीएफ बोबडे, उपविभागीय अधिकारी (महसूल) लोंढे, तहसीलदार लांजेवार यांच्यासह वन व महसूल विभागाचे अधिकारी तसेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वन विभागाने नुकसानभरपाई देण्याचे मान्य केल्याने सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. नुकसानभरपाईच्या मागणीवरून तणाव वन विभागाने २५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच मुलाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी रेटून धरली. ही मागणी पूर्ण केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी आग्रही भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, वन विभागाने मृताच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची तत्काळ आर्थिक मदत केली. तसेच उर्वरित ७.५० लाख रुपये सोमवारी (दि. १०) देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तणाव निवळला. या शिवारातील जंगलाला तारेचे कुंपण लावण्याची मागणीही व विभागाने मान्य केली.