शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विधवा असुरक्षित आणि बहिष्कृतही; धक्कादायक वास्तव, राज्य शासनाच्या आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:28 IST

शेतक-यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विधवांना घर, समाज, सरकारी प्रक्रिया, शेती आदी सर्वच आघाड्यांवर संघर्ष करावा लागत आहे. त्यातही पदोपदी अपमान, अवहेलना आणि वेळप्रसंगी बहिष्काराला तोंड द्यावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

- सविता देव हरकरेनागपूर : शेतक-यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विधवांना घर, समाज, सरकारी प्रक्रिया, शेती आदी सर्वच आघाड्यांवर संघर्ष करावा लागत आहे. त्यातही पदोपदी अपमान, अवहेलना आणि वेळप्रसंगी बहिष्काराला तोंड द्यावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.पती निधनाचे दु:ख, भावनिक आघात, अत्यंत कठीण आर्थिक परिस्थिती, कमालीची असुरक्षितता अशा परिस्थितीत स्वत:च्या अथवा मुलांच्या भविष्याचा विचार तर सोडा आजचा दिवस कसा जगायचा या काळजीने त्या खचून गेल्या. कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर येऊन पडते. महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत प्रकृती संस्था व हाऊसिंग अ‍ॅण्ड लॅण्ड राईटस् नेटवर्क यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात ही गोष्ट उघड झाली आहे.शेतकरी विधवांपुढील आव्हाने- शेतीचा सातबारा नावावर करून घेणे- संपत्तीत वाटा मिळविताना कुटुंबात होणारा विरोध- मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपण- स्वत:चा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह- मुलीचा संसार तुटलाच तर, तिच्या पालनपोषणाचा प्रश्न- कर्ज परतफेड- समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन- सरकार पातळीवर मदत मिळविताना होणारा त्रासपाहणीतील निष्कर्ष- घर अथवा जमिनीवरील हक्काची मागणी केली की कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडून त्यांना गप्प बसवले जाते.- अधिकार मागितले की, कुटुंबात बहिष्कृतासारखी वागणूक मिळते. मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. विशेषत: पदरी मुली असलेल्या स्त्रियांना अधिकार देण्यास स्पष्टपणे नकार दिला जातो.- वारसा हक्क किंवा आत्महत्येनंतर असलेल्या अधिकारांबाबत त्या अनभिज्ञ आहेत.शासनाकडून अपेक्षा- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवांवर होणारा अन्याय आणि बहिष्कारासारख्या घटनांना आळा घालण्याकरिता धोरणांची आखणी व अंमलबजावणी केली जावी. तसेच कायदेशीर तरतुदींचे पुनरावलोकन करून आवश्यक बदल केला जावा.- मानवाधिकार व महिलांच्या अधिकारांबाबत संबंधित विभागांतील अधिकाºयांना प्रशिक्षण द्यावे. त्यांना शेतकरी विधवांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील बनवावे.- पीडित स्त्रियांसाठी समुपदेशन केंद्रे स्थापन करावीत.शेतक-यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विधवा व मुले ज्या दाहक आर्थिक, सामाजिक आणि भावनिक वास्तवाला सामोरे जात आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न या अभ्यासात केला आहे. या परिस्थितीत काय सुधारणा करता येईल, हे देखील सुचविले आहे.- सुवर्णा दामले,कार्यकारी संचालक, प्रकृती

टॅग्स :Farmerशेतकरी