शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या अवयवदानाने चार रुग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 22:56 IST

अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे बुधवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीकडून हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करून चार रुग्णांना जीवनदान देण्यात आले तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, मेंदू मृत व्यक्ती ही शेतकरी असल्याने या दानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देहृदय, यकृत, मूत्रपिंड व नेत्रदान : न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पाचवे यकृत प्रत्यारोपण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे बुधवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीकडून हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करून चार रुग्णांना जीवनदान देण्यात आले तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, मेंदू मृत व्यक्ती ही शेतकरी असल्याने या दानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावातील रहिवासी सुरेश डुकरे (३५) असे अवयव दात्याचे नाव.प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वणी येथे झालेल्या रस्ता अपघातात सुरेश डुकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तेथील डॉक्टरांनी तपासून तातडीने नागपुरात हलविण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी रविवारी नागपुरातील लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. येथील न्यूरो सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल व त्यांच्या चमूने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु उपचारात सुरेशची साथ मिळत नव्हती. यातच मंगळवारी डॉक्टरांनी सुरेश यांचा ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. सुरेश यांना एक पाच व तीन वर्षाची मुलगी आणि पत्नी प्रिया आहे. कर्त्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या स्थितीतही डॉ. अग्रवाल यांनी डुकरे कुटुंबीयांना अवयवदानाची कल्पना दिली. स्वत:ला सावरत या कुटुंबीयांनी आपल्या माणसाचे अस्तित्व कायम राखण्याचा निर्णय घेतला. याची माहिती झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कॉर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. बुधवारी अवयव काढण्याच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड व नेत्रदान करण्यात आले.यवतमाळचे हृदय गेले चेन्नईलासुरेश डुकरे यांचे हृदय घेऊन जाण्यासाठी विशेष विमानाने चेन्नई येथील डॉक्टरांची चमू नागपुरात पोहचली. दुपारी ३.३० वाजता लकडगंज न्यू इरा हॉस्पिटल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ हा मार्ग ग्रीन कॉरिडोर करण्यात आला. केवळ १० मिनिटांच्या अवधीत रुग्णवाहिका विमानतळावर पोहचली. तेथून विशेष विमानाने हृदय चेन्नईला पोहचले. पुढील तीन तासांत हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपणही करण्यात आले. या शस्त्रक्रियेत डॉ. मनोज दुरारीराज, डॉ. प्रशांत धुमाळ, डॉ. शंतनु शास्त्री व मुकेश आदिले आदींचा सहभाग होता. यवतमाळचे हृदय नागपूरहून चेन्नईला गेले.३५ वर्षीय तरुणाला दिले यकृतकळमेश्वर येथील एका ३५ वर्षीय तरुणाचे यकृत निकामी झाल्याने तो न्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. सुरेश डुकरे यांच्या अवयवदानामुळे त्याला यकृत उपलब्ध झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होती. ही शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. राहुल राय, डॉ. साहिल बन्सल, डॉ. सविता जयस्वाल आणि डॉ. सोमंत चट्टोपध्याय यांनी केली.वोक्हार्ट व आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या रुग्णाला मूत्रपिंडाचे दानवोक्हार्ट हॉस्पिटल व आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या प्रत्येकी एक-एक रुग्णाला मूत्रपिंडाचे दान करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होती. यात मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. श्रीनारायण आचार्य, डॉ. योगेश देशमुख आदींचा सहभाग होता. तर सुरेश डुकरे यांची दोन्ही बुबुळ महात्मे नेत्रपेढीला दान करण्यात आली.

 

टॅग्स :Organ donationअवयव दानFarmerशेतकरी