नरखेड : माेटारपंप सुरू करीत असताना विजेचा जबर धक्का लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रानवाडी (ता. नरखेड) शिवारात रविवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. राजेंद्र अजाबराव खरपुरीया (४२, रा. रानवाडी, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राजेंद्र हा नेहमीप्रमाणे पिकाचे ओलित करण्यासाठी गेला हाेता. यादरम्यान शेतालगत असलेल्या रानवाडी तलाव क्रमांक १ येथे विद्युत पेटीजवळ माेटारपंप सुरू करीत असताना, त्यांना विजेचा जाेरदार धक्का लागला. त्यांना दवाखान्यात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी प्रमाेद ओमकार खरपुरीया (४२, रा. रानवाडी, ता. नरखेड) यांच्या तक्रारीवरून जलालखेडा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, तपास सहायक फाैजदार सातंगे करीत आहेत.
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST