शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला आर्थिक उत्पन्नापासून वंचित करणे कौटुंबिक हिंसाचारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 10:22 IST

कुटुंबातील महिलेला आर्थिक उत्पन्न मिळविण्यापासून वंचित करणे कौटुंबिक हिंसाचारच होय असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णयउत्पन्नाचे साधन काढून घेणे आर्थिक छळ

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंबातील महिलेला आर्थिक उत्पन्न मिळविण्यापासून वंचित करणे कौटुंबिक हिंसाचारच होय असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. कौटुंबिक हिंसाचारात केवळ शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ नाही तर, आर्थिक छळाचाही समावेश होतो. महिलेकडून उत्पन्नाचे साधन काढून घेण्याची कृती आर्थिक छळात मोडते असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. गडचिरोली येथे संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या सपना पटेल यांचे पती नीलेश हे मंगल कार्यालय सांभाळीत होते. परंतु, नीलेश यांच्या मृत्यूनंतर तो व्यवसाय ज्येष्ठ चुलत भाऊ प्रवीण यांनी स्वत:कडे घेतला. त्यामुळे सपना यांचे उत्पन्नाचे साधन हिरावल्या गेले. त्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचा दुसरा स्रोत नाही. त्यांना १८ वर्षाचा मुलगा असून त्याच्याकडेही उत्पन्नाचे साधन नाही.परिणामी, १६ आॅक्टोबर २०१४ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने सपना यांचा कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गतचा अर्ज अंशत: मंजूर करून त्यांच्याकडे मंगल कार्यालयाचा ताबा सोपविण्यात यावा असा आदेश दिला होता. त्याविरुद्ध प्रवीण यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. १८ एप्रिल २०१५ रोजी सत्र न्यायालयाने ते अपील मंजूर करून जेएमएफसी न्यायालयाचा आदेश रद्द केला होता. त्यानंतर, सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सपना यांनी उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने त्या अर्जावर वरीलप्रमाणे निर्णय दिला व सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करून जेएमएफसी न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.ती संयुक्त कुटुंबाची मालमत्ताईश्वरभाई व दिवंगत शंतनूभाई या दोन सख्ख्या भावांचे हे संयुक्त कुटुंब आहे. या कुटुंबाचे विविध व्यवसाय आहेत. शंतनूभाई यांना नीलेश व दिलीप तर, ईश्वरभाई यांना प्रवीण व नितीन ही मुले आहेत. त्यांनी संयुक्त कुटुंबाच्या उत्पन्नातून जमीन खरेदी करून त्यावर मंगल कार्यालय बांधले आहे. नीलेश यांनी जीवनभर या मंगल कार्यालयाचा व्यवसाय सांभाळला. परंतु, त्यांच्या मृत्यूनंतर प्रवीण यांनी तो व्यवसाय स्वत:कडे घेतला व नीलेश यांच्या कुटुंबीयांची जबाबदारीही स्वीकारली. असे असले तरी, यामुळे सपना यांच्याकरिता आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत कायमचा बंद झाला होता. न्यायालयाने हा निर्णय देताना ही तथ्ये लक्षात घेतली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय