शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकावर परिवाराला वेठीस धरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:31 IST

नवदुर्गा कॉलनी, भगिरथ पार्क वानाडोंगरी येथे राहणााऱ्या एका परिवाराला चाकूचा धाक दाखवून तीन लुटारूंनी त्यांच्याच घरात वेठीस धरून रोख तसेच सोन्याचे दागिने हिसकावून नेले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरोख आणि दागिने हिसकावून नेले : एमआयडीसीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवदुर्गा कॉलनी, भगिरथ पार्क वानाडोंगरी येथे राहणााऱ्या एका परिवाराला चाकूचा धाक दाखवून तीन लुटारूंनी त्यांच्याच घरात वेठीस धरून रोख तसेच सोन्याचे दागिने हिसकावून नेले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.नवदुर्गा कॉलनीत राहणारे संजय श्रीहरी लाकडे (वय ४८) खासगी नोकरी करतात. त्यांची पत्नी शिक्षिका असून, त्यांचा मुलगा दहावीत शिकतो. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री जेवण केल्यानंतर लाकडे परिवार घरात झोपी गेला. सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास किचनच्या लाकडी दाराला तोडून तीन सशस्त्र लुटारू त्यांच्या घरात शिरले. त्यांनी लाकडे दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून आरडाओरड केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी देत गप्प राहण्यास सांगितले. घरातील रोख आणि मौल्यवान दागिने तातडीने काढून देण्यास सांगत आरोपींनी त्यांना दम दिला. घाबरलेल्या लाकडे दाम्पत्याने घरातील पाच हजार रुपये तसेच सोन्या-चांदीचे दागिने आरोपींच्या हवाली केले. त्यानंतरही आरोपींनी त्यांना ओरडल्यास किंवा पोलिसांना फोन केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन पळ काढला. १५ मिनिटात हा प्रकार घडला. मात्र, भीतीमुळे बराच वेळ गप्प राहिलेल्या लाकडे दाम्पत्याने पहाटे ५ च्या सुमारास एमआयडीसी पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर लाकडे दाम्पत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला.बाहेरही होते आरोपी ?लाकडे दाम्पत्याच्या घरात तीन आरोपी पोहोचले असले तरी त्यांचे काही साथीदार बाहेरही पाळतीवर असावेत, असा संशय आहे. आरोपींना लाकडे दाम्पत्याची आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती माहिती असावी, असाही संशय आहे. त्यामुळे केवळ त्यांच्याचकडे गुन्हा करून आरोपी पळून गेले. एमआयडीसी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाRobberyदरोडा