शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जेईईची तयारी करणाऱ्यांना फेक न्यूजचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:00 IST

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना बसला. नेमक्या परीक्षा कधी होणार यासंदर्भात नागपूरकर विद्यार्थी तणावात असतानाच आता त्यांना फेक न्यूजचादेखील सामना करावा लागतो आहे.

ठळक मुद्देजुलैमध्ये परीक्षा होणार असल्याची अफवाएनटीएकडून अद्यापही तारखांची घोषणा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना बसला. नेमक्या परीक्षा कधी होणार यासंदर्भात नागपूरकर विद्यार्थी तणावात असतानाच आता त्यांना फेक न्यूजचादेखील सामना करावा लागतो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जेईई-मेन्ससह विविध परीक्षांच्या बनावट तारखा व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम वाढीस लागला असून, त्यांना नाहक मनस्तापदेखील सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.आयआयटीसह देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई-मेन्सचा दुसरा टप्पा ५ ते ११ एप्रिलदरम्यान होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे एनटीएने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. नवीन तारखांची अद्याप घोषणा झालेली नाही. नेमकी परीक्षा कधी होईल हे सांगता येणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शैक्षणिक संस्थांमध्येदेखील संभ्रम आहे.यास्थितीत सोशल मीडियावर ही परीक्षा जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला होईल, असे संदेश फिरण्यास सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनीदेखील महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसमध्ये विचारणा सुरू केली. परंतु प्रत्यक्षात त्यांनादेखील काही कल्पना नव्हती. याबाबत काही जणांनी एनटीएच्या हेल्पलाईन क्रमांकावरच विचारणा केली व तेव्हा ही अफवा असल्याचे लक्षात आले. केवळ जेईई-मेन्सच नव्हे तर इतरही प्रवेश परीक्षांबाबत असाच प्रकार होत असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.यासंदर्भात एनटीएने कठोर पावले उचलण्याचे निश्चित केले आहे. विद्यार्थ्यांनी अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच जर कुणी असा खोडसाळपणा केला तर त्याच्याविरोधात पोलीस तक्रार करण्याचा इशारा एनटीएने दिला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसexamपरीक्षा