शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा प्रकरण : महिलेला सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:38 IST

सत्र न्यायालयाने दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या  महिला आरोपीला कमाल सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी सोमवारी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या  महिला आरोपीला कमाल सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी सोमवारी हा निर्णय दिला.पद्मा अरुण ठवरे (४१) असे आरोपीचे नाव असून, ती टेका नाका येथील रहिवासी आहे. तिला भादंविच्या कलम ४८९-बी अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तर, कलम ४८९-सी अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. १४ जुलै २०१७ रोजी दुपारी ४ च्या सुमारास आरोपी महिला ही फिर्यादी भाऊराव मेश्राम यांच्या दुकानात भांडे खरेदी करण्यासाठी गेली होती. तिने ३०० रुपयांचे भांडे खरेदी केले व मेश्राम यांना दोन हजार रुपयांची नोट दिली. त्या नोटेवर मेश्राम यांना संशय आला. अधिक बारकाईने निरीक्षण केले असता नोट बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मेश्राम यांनी पाचपावली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मेश्राम यांच्या दुकानात पोहोचून पद्माची तपासणी केली असता दोन हजार रुपयांच्या आणखी तीन बनावट नोटा आढळून आल्या होत्या. न्यायालयात शासनातर्फे अ‍ॅड. एल. बी. शेंद्रे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर