शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बनावट चेचिस क्रमांकाचे ट्रक रस्त्यावर

By admin | Updated: January 8, 2015 01:19 IST

बोगस व बनावट चेचिस क्रमांकाच्या आधारे ओव्हरलोड वाहतुकीचा धक्कादायक प्रकार वर्धा आरटीओच्या कारवाईत पुढे आला आहे. अधिक चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस येण्याची भीती आरटीओने व्यक्त केली आहे.

वर्धा आरटीओची कारवाई : एकाच क्रमांकाचे तीन ट्रक चालविणारे रॅकेट असल्याचा संशयवर्धा : बोगस व बनावट चेचिस क्रमांकाच्या आधारे ओव्हरलोड वाहतुकीचा धक्कादायक प्रकार वर्धा आरटीओच्या कारवाईत पुढे आला आहे. अधिक चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस येण्याची भीती आरटीओने व्यक्त केली आहे. या प्रकरणी मंगळवारी रात्री आरटीओच्या फिर्यादीवरुन एका ट्रक मालकाविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा आरटीओकडे गुरुविंदर सिंग ऊर्फ गुल्लू ढिल्लन रा. नागपूर यांच्या सीजी ०४ जी ६३७४ या ट्रकबाबत तक्रार प्राप्त झाली. वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षकांना हे वाहन वर्धा हद्दीत आढळताच ते ताब्यात घेतले. शंका येताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय माजरीकर यांनी याबाबत अधिक चौकशी सुरू केली असता धक्कादायक बाबी पुढे आल्या. सदर वाहनाचा मूळ चेचिस नंबर घासून खोडलेला असून त्यावर नवीन बनावट अंकित केलेला आढळला, पार्ट नंबरही खोडलेला आहे. मात्र मोटार वाहन तपशिलावर ४२६०३१ केयुझेड १८४१२१ असा क्रमांक आढळून आला. याचा चेचिस टाकलेल्या क्रमांकाशी कुठेही ताळमेळ नाही. हा प्रकार साधासुधा नसून असे रॅकेट सक्रिय असावे, असा संशय पक्का झाला. ही कारवाई सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, मोटार वाहन निरीक्षक डी. झेड. राठोड, अश्फाक अहमद, वेणूगोपाल शेंडे, मोहन बोरडे, अनंद मेश्राम, संजय पाटील यांनी केली. या आधारे सदर वाहन मालकाविरुद्ध सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सदर ट्रक मालकाविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलीस आरोपी अटक करण्यासाठी रवाना झाले, मात्र अटक झाली नसल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)फायनान्स कंपन्यांनाही लाखोंचा गंडातीन ट्रक विविध नावाने फायनांसवर खरेदी करायचे. मात्र एका ट्रकची आरटीओकडे नोंद केली जात असल्यामुळे एका ट्रकचे फायनान्स संबंधित कंपन्या वसुल करुन घेतात. मात्र इतर दोन ट्रकची नोंदच नसल्यामुळे ते ट्रक कुठे आहे याचा शोधच लागत नसल्यामुळे फायनान्स कंपन्यांनाही याची मोठी झळ पोहचत असल्याचीही माहिती सूत्राने दिली.ओव्हरलोड वाहतुकीला प्रोत्साहनसदर ट्रकच्या माध्यमातून तीनपट जादा मालाची वाहतुक करण्यात येत असल्याची प्रकरणे यापूर्वी आरटीओ आणि पोलिसांच्या कारवाईत उघड झाल्याचे आरटीओ विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या कारवाईमुळे सदर रॅकेटचे धाबे दणाणले असून कारवाई रोखण्यासाठी आरटीओवर दबाब वाढवत असल्याची माहिती आहे.