शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस-राऊतांमध्ये रंगला श्रेयाचा कलगीतुरा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 06:50 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले.

नागपूर :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. या कन्व्हेंशन सेंटरची संकल्पनाच आपली असून, मंत्री असताना याला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे राऊत यांनी सांगितले, तर यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्री असताना या कामासाठी ८० कोटी दिले व आता पुन्हा १५ कोटी दिल्याचे सांगत ‘राऊतसाहेब थोडे श्रेय आम्हालाही द्या’, असा टोला लगावला.उत्तर नागपुरातील कामठी रोडवर उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरचे शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते थाटात लोकार्पण झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, माजी मंत्री नितीन राऊत, प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री राजकुमार बडोले, आ. कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके, माजी आ. डॉ. मिलिंद माने, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

या  कन्व्हेंशन सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी आणखी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. सोबत या सेंटरच्या मेन्टेनन्ससाठी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाउंडेशनसोबत करार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमासाठी वापर नको-गडकरीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे  कन्व्हेंशन सेंटर कुठल्याही लग्न किंवा रिसेप्शनसाठी दिले तर मी सर्वप्रथम विरोध करीन, असे नासुप्र सभापतींना यावेळी बजावले.