शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठासाठी अद्यापही फडणवीस मुख्यमंत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:05 IST

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला असताना संकेतस्थळावर मात्र अद्यापही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा असाही लेटलतिफपणा : संकेतस्थळावर अद्यापही बदल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लेटलतिफपणा अद्यापही कायमच आहे. आता तर चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातच विद्यापीठाने हलगर्जीपणा दाखविला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला असताना संकेतस्थळावर मात्र अद्यापही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची बाब हे चित्र संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीवर दिसून येत आहे. विद्यापीठाला मराठी संकेतस्थळाकडे इतके दुर्लक्ष सुरू आहे का असा प्रश्नदेखील यातून उपस्थित होत आहे.देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातूनच शिक्षण घेतले होते. २०१४ साली ते मुख्यमंत्री झाले व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट झाले. सलग दुसऱ्यांदा फडणवीस मुख्यमंत्रीदेखील झाले. परंतु आवश्यक संख्याबळ नसल्याने २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी राजिनामा दिला व २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अशा स्थितीत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर फडणवीस यांच्या उल्लेखासमोर माजी मुख्यमंत्री असा बदल करणे अपेक्षित होते. मात्र यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाला जाग आलेली नाही. अद्यापही तेच मुख्यमंत्री असल्याचे मुख्य पृष्ठावरच दिसून येत आहे. ‘लोकमत’या या अगोदर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील विविध त्रुटी समोर आणल्या आहेत. यात विद्यापीठाकडून उशीराने सुधारणा करण्यात आली. मात्र वारंवार असे प्रकार दिसून येत आहेत. यासंदर्भातील अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.‘सीएसआयआर’चे महासंचालक कोण ?याचप्रमाणे इतरही माजी विद्यार्थ्यांसंदर्भात विद्यापीठाने काळानुरुप बदल केलेले नाही. उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीत ‘सीएसआयआर’चे (कॉन्सिल ऑफ सायंटिफीक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीअल रिसर्च) माजी महासंचालक डॉ.एम.ओ.गर्ग यांचा अद्यापही महासंचालक म्हणूनच उल्लेख आहे. डॉ.गर्ग हे २४ ऑगस्ट २०१८ पर्यंतच ‘सीएसआयआर’चे महासंचालक होते. विशेष म्हणजे सद्यस्थितीत नागपूर विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी डॉ.शेखर मांडे हे ‘सीएसआयआर’चे महासंचालक आहेत. त्यांच्या नावासमोर मात्र तसा उल्लेख कुठेही नाही.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री