शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील वास्तव : २२ महिन्यांत ९ वाघांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 22:57 IST

अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन मागील काही काळापासून राजकारण तापले आहे. मात्र महाराष्ट्रात २०१७ पासून २२ महिन्यात ९ वाघांची शिकार करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे ही विदर्भातील आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देसर्वच प्रकरणे विदर्भातील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन मागील काही काळापासून राजकारण तापले आहे. मात्र महाराष्ट्रात २०१७ पासून २२ महिन्यात ९ वाघांची शिकार करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे ही विदर्भातील आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. राज्यात किती वाघांचा मृत्यू झाला, यातील शिकारीची प्रकरणे किती होती, आरोपींविरोधात काय कारवाई झाली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते २० आॅक्टोबर २०१८ या कालावधीत महाराष्ट्रात एकूण ३२ वाघांचे मृत्यू झाले. यातील २२ मृत्यू हे नैसर्गिक होते. १ मृत्यू हा अपघाताने झाला होता. नऊ वाघांची चक्क शिकार करण्यात आली. यात सहा वाघ तर तीन वाघि़णींचा समावेश होता. सर्व नऊन वाघांची शिकार २०१७ मध्ये करण्यात आली. शिवाय या घटना नागपूर, चंद्रपूर, वर्धा किंवा गडचिरोली जिल्ह्यातच झाल्या आहेत. सर्वात जास्त तीन शिकारी नागपूर जिल्ह्यात झाल्या. सहा वाघांची विद्युतप्रवाहाद्वारे शिकार करण्यात आली तर तीन वाघांची विषप्रयोग करुन शिकार झाली. २०१८ मध्ये आॅक्टोबर महिन्यापर्यंत एकाही वाघाची शिकार झाली नाही.२०१७ मध्ये होते १७१ वाघमहाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात ‘कॅमेरा ट्रॅप’ पद्धतीनुसार २०१५ मध्ये १३९ वाघ होते. २०१६ मध्ये हाच आकडा १५८ होता तर २०१७ मध्ये १७१ वाघांची नोंद झाली होती. सर्वाधिक ६९ वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात होते, तर मेळघाटमध्ये ४१ वाघ होते. पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या ४४ इतकी होती.

 

टॅग्स :TigerवाघRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता