लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका दहावीच्या विद्यार्थिनीला (वय १६) प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका फेसबुक फ्रेण्डला कळमना पोलिसांनी अटक केली. मनोज निळवंत आस्वले (वय २४, रा. वनदेवीनगर, कळमना) असे आरोपीचे नाव आहे.आरोपी मनोज महापालिकेच्या कचरा उचलण्याच्या वाहनावर काम करतो. मार्च २०१८ दरम्यान त्याची तक्रारदार मुलीसोबत फेसबुकवरून ओळख झाली. फेसबुक फ्रेण्ड झाल्यानंतर त्यांच्यातील संपर्क, भेटीगाठी वाढल्या. या दरम्यान त्याने मेडिकल चौकातील एका रुग्णालय परिसरात एकदा तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या संबंधाची मोबाईलमध्ये अश्लील क्लीप तयार केली. ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो नंतर तिच्यासोबत नेहमीच शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. वर्षभरापासून तो तिचे लैंगिक शोषण करीत होता. त्याच्या शोषणाला कंटाळलेल्या मुलीने दोन दिवसांपूर्वी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चौकशीनंतर कळमना पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात फेसबूक फ्रेण्डचा बलात्कार : अश्लील क्लीप बनविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 20:34 IST
एका दहावीच्या विद्यार्थिनीला (वय १६) प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका फेसबुक फ्रेण्डला कळमना पोलिसांनी अटक केली.
नागपुरात फेसबूक फ्रेण्डचा बलात्कार : अश्लील क्लीप बनविली
ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी