शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खासगी जिनिंगंकडून शेतकऱ्यांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 11:44 IST

राज्यात कापसाची आधारभूत किंमत ५,४५० रुपये आहे. पण सरकारी कापसाची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा कापूस शेतातच पडला आहे. याचा फायदा घेत खासगी खासगी जिनिंग व प्रेसिंगचे मालक शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत.

ठळक मुद्देसरकारने करावी कापसाची खरेदी : कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात कापसाची आधारभूत किंमत ५,४५० रुपये आहे. पण सरकारी कापसाची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा कापूस शेतातच पडला आहे. याचा फायदा घेत खासगी खासगी जिनिंग व प्रेसिंगचे मालक शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. खासगी जिनिंगवाल्यांनी कापसाचे दर पाडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने कापसाची खरेदी करावी, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. पण अजूनही शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात पिकविलेल्या कापसाची खरेदी झालेली नाही. सरकारने कापसाला ५,४५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु सरकारची कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकरी सरकारी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे खासगी जिनिंग व प्रेसिंग कंपन्यांच्या मालकांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेतला आहे. जिनिंग व प्रेसिंगवाले शेतकऱ्यांच्या कापसाला प्रतिक्विटल ३८०० ते ४२०० रुपये किं मत देत आहेत. चांगल्या प्रतीच्या कापसाची याच भावाने खरेदी होत आहे. त्यामुळे सर्व जिनिंग व प्रेसिंग मालकांना हमी भावाप्रमाणे कापूस खरेदी करण्याचे आदेश द्यावे, ज्या दिवशी शेतकऱ्यांनी अनामत स्वरूपात कापूस ठेवला व मोजणीही झाली त्याच दिवशीची किंमत शेतकऱ्यांना देण्यात यावी. जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागात लोडशेडिंंग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताला पाणी देता येत नाही. सरकारने लोडशेडिंग बंद करावे. खरीप हंगामाचा विचार करून मे अखेरपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंबंधात कापूस उत्पादक शेतकरी श्रीराम काळे, अरुण घोंगे, बाबाराव कोढे, बाबा पाटील, क्रिष्णा हेलोंडे, जानराव केदार यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे शनिवारी निवेदन दिले.१५०० रुपये प्रतिक्विंटल फरक द्यासरकारला कापूस खरेदी करणे शक्य नसेल तर, शेतकऱ्यांच्या आधारभूत किमतीच्या फरकाची तफावत रक्कम १५०० रुपये प्रतिक्विंटल शासकीय हमीभावाप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी