शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मेहंदीबाग रेल्वे अंडर ब्रिजच्या बांधकामाला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 20:52 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची विनंती मंजूर करून मेहंदीबाग येथील रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी)चे बांधकाम पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत वाढवून दिली.

ठळक मुद्देहायकोर्ट : दपूम रेल्वेची विनंती मंजूर

ऑनलाईन लोकमत 

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची विनंती मंजूर करून मेहंदीबाग येथील रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी)चे बांधकाम पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत वाढवून दिली.न्यायालयाने २३ जून २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार या ‘आरयूबी’चे काम २२ डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करायचे होते. परंतु, विविध करणांमुळे या मुदतीत ‘आरयूबी’चे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण दपूम रेल्वेतर्फे देण्यात आल्यामुळे न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. दपूम रेल्वेच्या वतीने वरिष्ठ विभागीय अभियंता (केंद्रीय) भोलाप्रसाद विश्वकर्मा यांनी न्यायालयात मुदतवाढीसाठी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. प्रतिज्ञापत्रानुसार, न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेने ‘आरयूबी’चे डिझाईन तयार करणे, डिझाईन मंजूर करणे, निविदा प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी बाबी केल्या. रायपूर येथील शिवजी अ‍ॅन्ड कंपनीला ‘आरयूबी’चे कंत्राट देण्यात आले आहे. कंपनीसोबत ३० जुलै २०१७ रोजी करारही करण्यात आला आहे. १ मे २०१७ रोजी रेल्वे व मनपा अधिकाºयांनी ‘आरयूबी’ परिसराचे संयुक्त निरीक्षण केले. दरम्यान, उत्तर-पूर्व भागात अतिक्रमण, पाणी पाईप लाईन इत्यादी अडथळे आढळून आले. मनपाला ते अडथळे दूर करण्यासाठी लागणारा खर्च रेल्वे देणार असून त्याला अद्याप मंजुरी मिळायची आहे. यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर लगेच ‘आरयूबी’च्या कामाला सुरुवात केली जाईल.यासंदर्भात खैरीपुरा-बिनाकी-मंगळवारी-प्रेमनगर निवासी कृती समितीने जनहित याचिका दाखल केली होती. मेहंदीबाग रेल्वे फाटकावर यापूर्वी रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) बांधण्यात आला आहे. परंतु, परिसरातील नागरिकांना या पुलावरून गेल्यास ‘यू टर्न’ घेऊन घराकडे जाणे अडचणीचे आहे. परिणामी, परिसरातील नागरिक रेल्वे फाटकातूनच जाणे पसंत करतात. रेल्वे फाटकाजवळ केवळ १३ फुटाचा मार्ग असल्याने वाहतूक कोंडी होते. या मार्गाने रोज सुमारे ४० रेल्वेगाड्या जातात व गेट उघडायला ३० ते ४० मिनिटे लागतात़ मूळ रस्ता ४० फुटांचा असून संरक्षण भिंतीमुळे रेल्वेगेटजवळ तो १३ फुटांचा होतो. दोन्ही बाजूने हीच परिस्थिती आहे. न्यायालयाने ही याचिका निकाली काढताना येथे १८ महिन्यांत ‘आरयूबी’ बांधण्याचा आदेश दिला होता. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर तर, रेल्वेतर्फे अ‍ॅड. नितीन लांबट यांनी बाजू मांडली.महत्त्वाचे मुद्दे१ - ‘आरयूबी’ हा ‘आरओबी’ला समांतर राहणार आहे. ‘आरयूबी’ वाहतुकीसाठी मोकळा झाल्यानंतर येथील रेल्वे फाटक (५६९) बंद करण्यात येईल.२ - न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. समितीने ‘आरयूबी’ बांधण्याची सूचना केली होती.३ - दपूम रेल्वेच्या मुख्य पूल अभियंत्यांनी २० सप्टेंबर २०१६ रोजी ‘आरयूबी’च्या आराखड्याला अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर निविदा मागविण्यात आल्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर