शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

एक ‘बाग’ आयुष्य वाढविणारी

By admin | Updated: October 19, 2015 03:13 IST

आज शहरी लोकांचे दैनंदिन आयुष्य अतिशय व्यस्त झाले आहे. सकाळी उठल्यापासून त्यांच्यावर कामाचा ताण असतो.

दुर्मिळ वृक्षांचे लाईव्ह संग्रहालय : विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या संधीनागपूर : आज शहरी लोकांचे दैनंदिन आयुष्य अतिशय व्यस्त झाले आहे. सकाळी उठल्यापासून त्यांच्यावर कामाचा ताण असतो. त्यासाठी प्रत्येकजण दिवसभर धावत असतो. यात अनेकदा त्याला श्वास घेण्याचीसुद्धा सवड मिळत नाही. या धावपळीच्या जीवनामुळे शहरी लोकांच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत उपराजधानीतील लोकांसाठी शहरातच हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालून आयुष्य वाढविणारी ‘बाग’ अ‍ॅग्रिकोज वेल्फेअर फोरमच्या माध्यमातून गोरेवाडा परिसरात विकसित करण्यात आली आहे.‘अ‍ॅग्रिकोज वेल्फेअर फोरम’ ही वेगवेगळ््या विभागातील उच्चपदांवरू न सेवानिवृत्त झालेल्या कृषी पदवीधरांची संस्था आहे. याच संस्थेचे पदाधिकारी असलेले गंगाप्रसाद ग्वालबंशी यांनी गोरेवाडा जंगलाशेजारी असलेली त्यांच्या मालकीची चार एकरमधील ‘बाग’ ‘अ‍ॅग्रिकोज’ फोरमला भेट दिली आहे. विशेष म्हणजे, ग्वालबंशी यांनी आपल्या चार वर्षांच्या परिश्रमातून ही बाग फुलविली आहे. या बागेत ५० पेक्षा अधिक फळझाडांसह औषधी वनस्पतींचा समावेश आहे. उपराजधानीच्या हद्दीत एकाच ठिकाणी विविध प्रकारची एवढी मोठी झाडे असलेली ही एकमेव ‘बाग’ आहे. त्यामुळे ही बाग आयुष्य वाढविणारी तर आहेच, शिवाय संशोधनाच्या दृष्टीनेही ती महत्त्वपूर्ण ठरत आहे. आजच्या आधुनिक युगात नवीन पिढी वृक्षाच्या माहितीपासून दुरावत चालली आहे. त्यामुळे एखादा कृषी पदवीधरसुद्धा दहा-वीस दुर्मिळ वृक्षांची माहिती सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत ही बाग विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या दृष्टीने ‘दुर्मिळ वृक्षांचे लाईव्ह संग्रहालय’ ठरत आहे. त्यामुळेच येथे रोज शहरातील विविध शाळा-महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी व शिक्षक भेटी देत आहेत. (प्रतिनिधी)