शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरती प्रक्रियेला मुदतवाढ द्या!

By admin | Updated: October 22, 2014 00:58 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक मंगळवारी पार पडली. यात महाविद्यालयांना शिक्षक भरतीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काही

नागपूर विद्यापीठ : व्यवस्थापन परिषद सदस्यांची मागणीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक मंगळवारी पार पडली. यात महाविद्यालयांना शिक्षक भरतीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काही सदस्यांनी लावून धरली. रोस्टर तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे ३० आॅक्टोबरपर्यंत मंजूर शिक्षकसंख्येच्या ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती करणे शक्य नाही, अशी भूमिका यावेळी सदस्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूर विद्यापीठाने ५० टक्के शिक्षक भरतीसंबंधी अध्यादेश काढला होता व ३१ आॅक्टोबरपर्यंत महाविद्यालयांनी शिक्षकभरती करावी, असे निर्देश देण्यात आले होते. परंतु, अद्याप अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षक नियुक्ती रखडली असून मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. ज्या महाविद्यालयांनी खरोखर प्रयत्न केले आहेत. त्यांची शहनिशा करून त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, असा मार्ग काढण्यात आला. विशेष म्हणजे विद्यापीठाच्यावतीने रोस्टर पास केले जात नसल्यामुळे शिक्षक भरतीसाठी अनेक अडचणी निर्माण होतात, असा आवाज विधीसभेच्या बैठकीत काढण्यात आला होता. तसेच, २००२ पासून मरगळलेल्या रोस्टर प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने आतापर्यंत झालेल्या घटनाक्रमाची ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह नोट’ व्यवस्थापन समितीसमोर मांडावी. त्यावर व्यवस्थापन विचार करून निर्णय घेईल असे ठरले. सोबतच ‘फायर इंजिनिअरींग’चा सुधारित अभ्यासक्रम व परीक्षाप्रणालीला मान्यता देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.विधिसभेची बैठक ३० रोजीदरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक ३० आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत यातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विधीसभेतील सदस्यांकडून बैठकीसाठी प्रश्न व प्रस्ताव मागविण्यात आले होते. विद्यापीठ प्रशासनाला ३२१ प्रश्न मिळाले. यातील कुठले प्रश्न व प्रस्तावांना बैठकीच्या अजेंड्यात सहभागी करावे यासंदर्भात चर्चा झाली.(प्रतिनिधी)