शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘मिहान-सेझ’मध्ये निर्यातीला प्रोत्साहन; ४ टक्क्यांपर्यंत सूट, ‘रोडटेप’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 29, 2025 22:05 IST

केंद्र सरकारच्या या योजनेमुळे नागपूरच्या मिहान-सेझमध्ये गुंतवणूकदार वाढणार असून हे फायदे एसईझेड आणि ईओयूसाठी १ जूनपासून लागू होतील. जागतिक बाजारपेठेत भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा हा निर्णय आहे.

नागपूर : देशातील विशेष आर्थिक क्षेत्रे (एसईझेड) आणि निर्यातभिमुख युनिट्सला (ईओयू) निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि करांमध्ये सूट देण्याच्या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एसईझेड आणि ईओयूमधून निर्यात केलेल्या उत्पादनांना विहित श्रेणींनुसार ‘रोडटेप’ (निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि करांमध्ये सूट) योजनेत १ ते ४ टक्के सूट मिळेल. त्यामुळे निर्यातीला चालना आणि उद्योजकांना दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या या योजनेमुळे नागपूरच्या मिहान-सेझमध्ये गुंतवणूकदार वाढणार असून हे फायदे एसईझेड आणि ईओयूसाठी १ जूनपासून लागू होतील. जागतिक बाजारपेठेत भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा हा निर्णय आहे. यापूर्वी, एसईझेड आणि ईओयू ‘रोडटेप’च्या या फायद्यापासून वंचित होते. निर्यात प्रोत्साहन परिषद, मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन, असोचेम आणि फिफो यांनी रोडटॅपचे फायदे सेझ आणि ईओयूला देण्याची शिफारस केली होती. आता या दोन्ही योजना लागू झाल्यामुळे, सर्व क्षेत्रातील निर्यातदारांना समान संधी उपलब्ध होतील.

रोडटॅप योजना १ जानेवारी २०२१ पासून सुरू आहे. ही जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसार आहे आणि पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी एका व्यापक एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अंमलात आणली जाते.

उद्योजकांना होणार फायदे

योजनेत सेझचा समावेश झाल्याने उद्योजकांना फायदा होईल. अंमलबजावणीनंतर सेझमधून निर्यात आणखी वाढेल. नवीन गुंतवणूकदार येतील. जुन्या युनिट्समध्येही उत्साह निर्माण झाला आहे.प्रवीण कुमार, विकास आयुक्त, मिहान-सेझ.

निर्णय स्वागतार्हसरकारचा हा स्वागतार्ह निर्णय आहे. यामुळे व्यवसाय वाढेल, निर्यातीला वेग येईल. सेझमध्ये नवीन कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी योजना महत्त्वाची असून रोजगार वाढेल.मनोहर भोजवानी, अध्यक्ष, मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन.