शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांच्या अधिकारावर भूमिका स्पष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:09 IST

कोरोना संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने ३ व ४ मे रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचना महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अधिकारांतर्गत येतात किंवा नाही यावर येत्या १५ मेपर्यंत विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी १५ मेपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने ३ व ४ मे रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचना महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अधिकारांतर्गत येतात किंवा नाही यावर येत्या १५ मेपर्यंत विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, अ‍ॅड. कमल सतुजा, अ‍ॅड. मनोज साबळे व अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. मनपा आयुक्तांनी ३ व ४ मे रोजी अधिसूचना जारी करून लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तूंसह अन्य काही दुकाने सुरू करण्याची मुभा दिली आहे. त्यात खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य अनेक प्रकारच्या दुकानांचा समावेश नाही. परिणामी, याचिकाकर्त्यांनी या अधिसूचनांवर आक्षेप घेतले आहेत. मुंढे यांनी अधिकारांच्या बाहेर जाऊन वादग्रस्त अधिसूचना जारी केल्या. दोन्ही अधिसूचना अवैध व आधारहीन आहेत. तसेच, वादग्रस्त अधिसूचनेने केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली झाली आहे. केंद्र सरकारने वाढीव लॉकडाऊन काळाकरिता १ मे रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानंतर राज्य सरकारने २ मे रोजी केंद्र सरकारसोबत सुसंगत असलेली सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्याद्वारे प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य परिसरामध्ये अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेली खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य सर्व दुकाने सुरू करण्याची सशर्त मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांच्या वादग्रस्त अधिसूचना रद्द करण्यात याव्यात असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्याम देवानी, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.किशोर लांबट यांची याचिकेतून माघारयाचिकाकर्त्यांमध्ये अ‍ॅड. किशोर लांबट यांचाही समावेश होता. परंतु, लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडण्यास वैयक्तिक विरोध असल्यामुळे त्यांनी याचिकेतून माघार घेतली. न्यायालयाने त्यांचा यासंदर्भातील अर्ज मंजूर केला.

 

टॅग्स :Courtन्यायालय