शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नि:शुल्क कोरोना उपचारावर भूमिका सांगा; उच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:29 IST

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांना नि:शुल्क उपचार उपलब्ध करून देण्यावर खासगी रुग्णालयांनी भूमिका मांडावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांना नि:शुल्क उपचार उपलब्ध करून देण्यावर खासगी रुग्णालयांनी भूमिका मांडावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. तसेच, खासगी रुग्णालयांच्या अडचणी दूर करण्यास न्यायालय तयार असल्याचे सांगितले.उच्च न्यायालयात कोरोनासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला न्यायालयाने कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयातही नि:शुल्क उपचार व्हायला पाहिजे असे मत व्यक्त केले होते. त्यावर विभागीय आयुक्तांनी सरकारच्या वतीने उत्तर सादर केले. सरकारने १७ ऑगस्ट रोजी जीआर जारी करून कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नि:शुल्क उपचार करण्यासाठी २० निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार या योजनेच्या पॅनलमधील ३१ खासगी व ९ सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर नि:शुल्क उपचार केले जात आहेत. खासगी रुग्णालयांना उपचाराचा खर्च सरकारद्वारे परत दिला जातो अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. तसेच, इतर खासगी रुग्णालयांनी ही योजना स्वीकारल्यास कोरोना रुग्णांना सर्व ठिकाणी नि:शुल्क उपचार मिळेल असे सांगितले. न्यायालयाने सदर बाब लक्षात घेता हा आदेश दिला.खासगी रुग्णालयांच्या कोरोनासंदर्भातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची १ ऑक्टोबरला बैठक आहे. त्यात कोरोना रुग्णांवर नि:शुल्क उपचाराच्या मुद्यावर सखोल चर्चा करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.७०४ कोरोना खाटा रिकाम्यानागपुरात ७०४ कोरोना खाटा रिकाम्या असल्याची माहिती सरकारने न्यायालयाला दिली.नागपुरातील ५९ खासगी व ६ सरकारी रुग्णालयाना कोरोना रुग्णालय घोषित करण्यात आले आहे. यातील खासगी रुग्णालयात ४९९ तर सरकारी रुग्णालयात २०५ खाटा रिक्त आहेत, असे उत्तरात स्पष्ट करण्यात आले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHigh Courtउच्च न्यायालय