लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी आणि स्वानुभावातून डेबूचे गाडगेबाबा कसे झाला, हे नव्या पिढीला सांगणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी केले.
असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लाॅईजच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या ६४ व्या स्मृतिदिनानिमित्त रविनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारतीय वनसेवेतील अधिकारी विजय गोडबोले, मुख्य लेखापाल प्रदीप शेंडे, वनसंरक्षक सतीश वडसकर, वनीकरण वनवृत्ताचे संरक्षक डॉ. किशोर मानकर उपस्थित होते.
आपल्याजवळ गाडगेबाबांद्दल विपुल ज्ञानसंपदा, साहित्य आहे. पण डेबूबद्दल नाही. ती माहिती मिळविणे गरजेचे आहे. सामाजिक भावनेची नस ज्या गाडगे महाराजांना कळली, तोच डेबू १२ वर्षे कुठे होता, याचा नकाशा तयार करणे काळाची गरज असल्याचे वानखडे म्हणाले. संचालन कल्पना चिंचखेडे यांनी केले तर आभार विलास तेलगोटे यांनी मानले. यावेळी संजय दहिवले, राजन तलमले, भावना वानखडे, सुलभा गायकवाड, प्रतिमा पथाडे, ज्योती लभाने, रिमोद खरोळे, मोहन गजिभये, अरुण भगत, संतोष वानखडे उपस्थित होते.
.........