शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक नात्यातील दुरावा दर्शविणारे ‘एक्सपायरी डेट’, शतस्पंदन पश्चिम क्षत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव

By जितेंद्र ढवळे | Updated: January 23, 2024 19:31 IST

आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होतो आहे.

नागपूर: आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होतो आहे. मात्र कौटुंबिक नात्यांमध्ये देखील दुरावा निर्माण होत असल्याचे सामाजिक चित्र आहे. कौटुंबिक नात्यांमध्ये आलेला दुरावा ‘एक्सपायरी डेट’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकांकिकेमधून दर्शविण्यात आला. या एकांकिकेने प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळविली. मुले शिकून विदेशात जातात. त्यानंतर कौटुंबिक नाते जपण्यात त्यांना काही वेळ मिळत नाही. वृद्ध आई-वडिलांना एकटे सोडून त्यांच्या मृत्यूचा अर्थात 'एक्सपायरी डेट'चा कसा इव्हेंट केला जातो. याचे भावस्पर्शक सादरीकरण या एकांकिकेमधून करण्यात आले आहे.

मुलगा विदेशातूनच आपल्या आई-वडिलांची भविष्यातील मृत्यूची काळ वेळ आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे माहिती करण्याचा प्रयत्न करतो. मृत्यूची काळ-वेळ निश्चित झाली की आपल्याला येता येईल, असा मुलाचा समज असतो. या एकांकिकेत नेहरू नामक पात्राची एक्सपायरी डेट ही १४ ऑगस्टच्या रात्री असते. या एक्सपायरी डेटच्या निमित्ताने विविध इव्हेंट कसे केले जातात याचे देखील सादरीकरण यात करण्यात आले.

मुलगा विदेशातून येतो, मृत्यूच्या निश्चित वेळेस त्याच्या वडीलास केवळ अस्वस्थ वाटते. 'एक्सपायरी डेट' नंतर देखील वडिलांना जिवंत बघून मुलगा वैतागून निघून जातो. यानंतर पती पत्नी हेच एकमेकाचे अंतिम साथीदार असल्याचे सुंदर सादरीकरण यात करण्यात आले. या एकांकिकेमध्ये ब्रायन डोंगरदिवे, सिफा अन्सारी, जयंत कुरजेकर, नितीन मरसकोल्हे, वेदश्री राजुरकर, गायत्री श्रृंगारपूरकर, हर्ष दयारामानी यांनी अभिनय केला आहे. एकांकिकेचे दिग्दर्शन सारंग गुप्ता व जय गाला यांनी केले तर संगीत मोहित सरकार यांनी दिले आहे. 

या विद्यापीठांच्या संघाने केले सादरीकरण गांधीनगर विद्यापीठ गुजरात, डी. वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, गणपत विद्यापीठ मेहसाणा गुजरात, सरदार पटेल विद्यापीठ आनंद गुजरात, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, पारुल विद्यापीठ वडोदरा, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, महाराजा कृष्णकुमारसिंहजी भावनगर विद्यापीठ भावनगर गुजरात, हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजरात विद्यापीठ पाटण गुजरात, निरमा विद्यापीठ, गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अहमदाबाद गुजरात, भक्त कवी नरसिंह मेहता विद्यापीठ जुनागढ, गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी देखील सादरीकरण केले.

टॅग्स :nagpurनागपूर