शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

२६ मे रोजी अनुभवा ‘झिरो शॅडो डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 10:57 IST

अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली भरदिवसा साथ सोडणार. होय, येत्या २६ मे रोजी ही सावली अजिबात दिसणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली भरदिवसा साथ सोडणार. होय, येत्या २६ मे रोजी ही सावली अजिबात दिसणार नाही.खगोलशास्त्राच्या भाषेत याला ‘शून्य सावली दिवस’ (झिरो शॅडो डे) असे संबोधले जाते. खगोलशास्त्र तज्ज्ञानुसार येत्या २६ मे रोजी भर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी हा शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. जिल्ह्यात २४ ते २८ मे याकाळात शून्य सावलीचा अनुभव येईल. या क्षणी आपली सावली आपल्या पायाखाली पडते व जणूकाही ती गायब झाली असे वाटते. ही खगोलीय घटना रोमांचकारी अनुभवच आहे. तज्ज्ञांच्यानुसार पृथ्वीचा धु्रव २३.५ अंश उत्तरेकडे कलल्याने परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन होते. त्यामुळे सूर्य विषुववृत्तापासून दक्षिणेकडे २३.५ अंश आणि उत्तरेकडे २३.५ अंश भ्रमण करताना दिसतो. एखाद्या अंशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते आणि शून्य सावली अनुभवता येते. सूर्याचा आंशिक कोन मोठा असल्याने एकाच दिवशी दोनदा शून्य सावली अनुभवता येते. वर्षातून दोनदा सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली आपल्यालाच दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. मे महिन्यात ३ ते ३० मे दरम्यान १५ ते २२ उत्तर अक्षांशावर महाराष्टष्ट्रात शून्य सावली दिवस घडतो. राज्यात २० ते ३० मेदरम्यान आणि १६ जुलै व ५ आॅगस्टदरम्यान शून्य सावली दिवसाचा अनुभव येईल. मकरवृत्त दक्षिणेकडच्या भागात आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधी डोक्यावर येत नाही. पण दोन टोकांच्या वृत्तामधील लोकांना सूर्य वर्षातून दोनदा डोक्यावर आल्याचा अनुभव येतो व शून्य सावलीचा अनुभव मिळतो.

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवस