शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वायुसेनेच्या संग्रहालयात घ्या मिसाइलचा अनुभव; काय-काय पाहता येईल? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 08:55 IST

भारतीय वायुसेनेतील आतापर्यंतच्या सर्व फायटर जेट विमानांची माहिती संग्रहालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागपूर - आजपर्यंत झालेल्या युद्धांमध्ये भारतीय वायुसेनेने चित्तथरारक कारवाया करून भारताचा तिरंगा फडकवला. या कामगिरीची माहिती लहान मुले, तरुण आणि नागरिकांना व्हावी, या हेतूने भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडने वायुसेनानगरमध्ये भव्य वायुसेना संग्रहालय उभारले आहे. शुक्रवारी एअर मार्शल विजय कुमार गर्ग, एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ, मेंटेनन्स कमांड यांच्या हस्ते या संग्रहालयाचा शुभारंभ झाला. मध्य भारतातील हे पहिले संग्रहालय शनिवारपासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले होणार आहे. 

संग्रहालयात आल्यावर काय पाहता येईल? विविध प्रकारची विमाने, हेलिकॉप्टर आणि मिसाईल्सची मॉडेल्स प्रदर्शित करण्यात आली आहेत. या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर वायुसेनेच्या आजवरच्या प्रगतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेता येईल. येथे लढाऊ विमाने आणि उपकरणांसोबत वायुसेनेतील वीर सैनिकांचे फोटो लावून कामगिरीचा आढावा घेतला आहे. 

मंगळवारी बंद राहीलहे संग्रहालय मंगळवारी बंद राहणार आहे. इतर दिवशी  सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहील, अशी माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी ग्रुप कॅप्टन रत्नाकर सिंह यांनी दिली.

विशेष खोलीची व्यवस्था भारतीय वायुसेनेतील आतापर्यंतच्या सर्व फायटर जेट विमानांची माहिती संग्रहालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे येथे लावण्यात आलेल्या सिम्युलेटरच्या माध्यमातून तरुण, नागरिकांना फायटर जेट उडवण्याचा व या फायटर जेटच्या माध्यमातून शत्रूंवर मिसाईलने हल्ला करण्याचा अनुभव मिळणार आहे. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल