शहरं
Join us  
Trending Stories
1
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
2
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
3
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
4
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
5
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
6
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
7
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
8
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
9
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
10
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
11
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
12
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
13
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
14
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
15
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
16
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
17
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
18
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
19
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

ताडोबाच्या निसर्गरम्य वातावरणात साकारलेल्या मनमोहक कलाकृतींचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 20:42 IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गरम्य वातावरणात सुप्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शन रविवारपासून लोकमत चौक येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजनप्रसिद्ध चित्रकारांच्या हस्ते उद्घाटन६ ते १३ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी खुले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गरम्य वातावरणात सुप्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शन रविवारपासून लोकमत चौक येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी करण्यात आले.जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ताडोबा येथील इरई सफारी रिट्रीटमध्ये आयोजित ‘जवाहरलाल दर्डा स्मृती आर्ट कॅम्प २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार विनोश शर्मा यांच्या संयोजनात या कॅम्पमध्ये मुंबई येथील आनंद पाचाळ, ब्रिंदा मिलर, दीपक शिंदे, कहीनी अर्ते-मर्चंट, प्राजक्ता पालव, संजीव सोनपिंपरे, सुहास बाहुलकर, सूर्यकांत लोखंडे, स्वीता राय, हैद्राबाद येथील लक्ष्मण ऐले, दिल्ली येथील मनीष पुष्कळे, शोभा ब्रुटा, तेजिंदर कांडा, विजेंदर शर्मा, पुणे येथील एम. नारायण, वडोदरा येथील रिनी धुमाळ, गुवाहाटी येथील वाहिदा अहमद, पटना येथील युसुफ हुसैन आणि पॅरिस येथून सुजाता बजाज असे एकूण २० प्रथितयश चित्रकार सहभागी झाले होते. विदर्भात अशा प्रकारच्या कॅम्पचे आयोजन प्रथमच करण्यात आले असल्याने, हे शिबिर अनेकार्थाने कौतुकास्पद ठरले. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या या चित्रकारांनी गेले पाच दिवस ताडोबाच्या निसर्गरम्य वातावरणात स्वत:च्या अभिव्यक्तीला चालना देत सुरेख चित्रकृती साकारली. त्या चित्रकृतींचे प्रदर्शन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये लावण्यात आले आहे. शनिवारी या प्रदर्शनाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी, कॅम्पमध्ये सहभागी सर्व कलावंत व कॅम्पमध्ये कलावंतांच्या मनोवृत्तीचे निरीक्षण करणाऱ्या कला समीक्षक साधना बाहुलकर उपस्थित होते. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे पर्यवेक्षक अमित डोनाडे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संचालन मतीन खान यांनी केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे चित्रप्रदर्शन ६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते रात्री ८ वाजतापर्यंत बघता येणार आहे.आम्हा सगळ्यांना म्युझियमची उत्सुकता - सुहास बाहुलकरताडोबा म्हणून निसर्गाचा अनुपम असा सोहळाच आहे. अशा रम्य वातावरणात सर्व चित्रकारांनी एकसाथ आपल्या कलाकृतींना आकार दिल्याचा आनंद आहे. आम्ही चित्र साकारले आणि आता हे चित्र दर्डा कुटुंबीयांकडून साकारल्या जाणाऱ्या कन्टेम्पररी म्युझिममध्ये कधी लागतील, याची उत्सुकता लागली असल्याचे ज्येष्ठ चित्रकार सुहास बाहुलकर यांनी यावेळी सांगितले. यासोबतच, शिबिरात सर्व कलावंतांनी अशा शिबिराबद्दल जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी आणि लोकमत माध्यम समूहाचे आभार मानले.

टॅग्स :Jawaharlal Darda Art Galleryजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीpaintingचित्रकला