सावनेर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सावनेर शाखेची सभा नुकतीच पार पडली असून, त्यात नवीन कार्यकारिणीची निर्मिती करण्यात आली, अशी माहिती असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत दिली.
अध्यक्षपदी डॉ. नीलेश कुंभारे, उपाध्यक्षपदी डॉ. आशिष चांडक व डॉ. उमेश जीवतोडे, सचिवपदी डाॅ. परेश झोपे, सहसचिवपदी डॉ. विलास मानकर, कोषाध्यक्षपदी डॉ. शिवम पुन्यानी यांची, तर आमंत्रित सदस्यपदी डॉ. विजय धोटे, डॉ. चंद्रकांत मानकर, डॉ. स्मिता भुडे, डॉ. अमित बाहेती व डॉ. प्रवीण चव्हाण यांची निवड करण्यात आली, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
डॉ. जयंत कुळकर्णी, डॉ. विजय धोटे, डॉ. अशोक घटे, डॉ. विजय घटे, डॉ. रवींद्र नाकाडे व डॉ. विनोद बोकडे यांनी २० वर्षांआधी पुढाकार घेत सावनेर शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेची स्थापना केली. मावळत्या कार्यकारिणीने नवनिर्वाचित कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष डॉ. नीलेश कुंभारे यांनी भविष्यातील नियाेजन, काेराेना रुग्णांची प्लाझ्मा तपासणी व दान शिबिर आयाेजनाचा मानस व्यक्त केला. जिल्हा अध्यक्ष डॉ. विजय धोटे यांनी जिल्हाभर आराेग्यविषयक कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगितले.