शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

प्रशासनात खळबळ : केंद्रीय पथक आले, नागपूर मनपाला थांगपत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:33 IST

स्वच्छ शहरांच्या यादीत २०१९ या वर्षात नागपूर कोणत्या क्रमांकावर असेल याची उत्सुकता लागली आहे. याची पार्श्वभूमी पुढील सहा दिवसात ठरण्याची शक्यता आहे. स्वच्छता सर्वेक्षण-२०१९ साठी केंद्रीय पथक नागपुरात पोहचले आहे. प्रशासनाला माहिती न देता पथक शहरातील विविध भागाचा दौरा करून स्वच्छतेची माहिती घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दक्षिण व पश्चिम नागपुरातील काही भागाची पथकाने पाहणी केली. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंगळवारी दुपारपर्यंत याची माहिती नव्हती. सायंकाळच्या सुमारास महापालिका सूत्रांनी पथक नागपुरात पोहोचल्याला दुजोरा दिला.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची घेतली तातडीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ शहरांच्या यादीत २०१९ या वर्षात नागपूर कोणत्या क्रमांकावर असेल याची उत्सुकता लागली आहे. याची पार्श्वभूमी पुढील सहा दिवसात ठरण्याची शक्यता आहे. स्वच्छता सर्वेक्षण-२०१९ साठी केंद्रीय पथक नागपुरात पोहचले आहे. प्रशासनाला माहिती न देता पथक शहरातील विविध भागाचा दौरा करून स्वच्छतेची माहिती घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दक्षिण व पश्चिम नागपुरातील काही भागाची पथकाने पाहणी केली. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंगळवारी दुपारपर्यंत याची माहिती नव्हती. सायंकाळच्या सुमारास महापालिका सूत्रांनी पथक नागपुरात पोहोचल्याला दुजोरा दिला.पथक आल्याची माहिती मिळताच महापालिका प्रशासन सक्रिय झाले. सायंकाळी उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात आरोग्य निरीक्षक, झोनचे सहायक आयुक्तासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला.केंद्रीय पथकात किती जणांचा समावेश आहे, कोण कोण आहेत. तसेच कोणत्या भागांची पाहणी केली याची कोणत्याही प्रकारची माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही. सूत्रांच्या माहितीनुसार या पथकात पाच जणांचा समावेश आहे. त्यांनी दक्षिण व पश्चिम नागपुरातील हनुमाननगर, नेहरूनगर व धरमपेठ भागातील अनेक ठिकाणांची पाहणी केली. बाजार भागाचीही माहिती घेतली. आठवडाभर पथक नागपुरात वास्तव्यास आहे. परंतु पथकाचा मुक्काम नेमका कुठे आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रीय पथक कचरा संकलन, वाहून नेणे, प्रक्रिया व स्वच्छतेबाबतच्या अन्य बाबींची माहिती जाणून घेणार आहे. पथकाच्या दौऱ्याचा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात आला आहे. नवी दिल्लीहून त्यांना ऑनलाईन लोकेशन दिले जात आहे. गुगल मॅपनुसार पथक त्या ठिकाणी पोहचते व स्वच्छतेची पाहणी क रते. कार्वी कंपनीला गृह व नागरी विभागाने सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. पथक दोन चमूत पाहणी करून माहिती संकलित करीत आहेत.स्वच्छता सर्वेक्षणाची महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. कचरा संकलन केंद्रांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तसेच प्रक्रिया करण्यासाठी प्रभावी पयत्न करण्यात आले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या क्रमवारीत सुधारणा होणार असल्याचा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.दस्तावेज तपासणार नाहीगेल्या वर्षी केंद्रीय पथकाने पहिल्या दिवशी महापालिका मुख्यालयात दस्तऐवजांची तपासणी केली होती. यावेळी दस्तऐवज तपासण्यात येणार नाही. १६८ नमुन्यात माहपालिकेकडून विविध स्वरुपाची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने केंद्र सरकारला ऑनलाईन पाठविली आहे. त्यानुसार केंद्रीय पथक स्थळे निश्चित करून पाहणी करीत आहे. पथक १०० हून अधिक नागरिकांशी चर्चा करणार आहे. त्याचा फिडबॅक ऑनलाईन नोंदविला जाणार आहे.पथकाच्या दौऱ्याची माहिती नाहीकेंद्रीय पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासनाला कोणत्याही स्वरुपाची माहिती नसल्याचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार पथक नगपुरात स्वत:च्या स्तरावर दौरा करीत आहे. पथकातील सदस्य कोणत्या भागाचा दौरा करणार, त्यांचा मुक्काम कोठे आहे याची कोणत्याही प्रकारची माहिती नाही. केंद्रीय पथक स्वत: स्वच्छतेची पाहणी करून आकलन करणार आहेत. यावेळी चांगले प्रयत्न करण्यात आले आहे. क्रमवारीत निश्चित सुधारणा होईल.रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त महापालिका

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान