शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केस, नख सोडल्यास प्रत्येक अवयवावर क्षयरोगाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 12:56 IST

शरीरावरील केस आणि नख सोडल्यास प्रत्येक अवयव टीबीच्या विळख्यात येऊ शकतो. २४ फेब्रुवारी हा दिवस क्षयरोग निवारण दिन म्हणून पाळला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला मेडिकलच्या श्वसन रोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देलोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक क्षयरोगाच्या विळख्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक क्षयरोगाच्या विळख्यात आहेत. या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा विचार केल्यास एचआयव्ही एड्सनंतर सर्वात घातक हे ‘इन्फेक्शन’ आहे. ‘टीबी’ हा ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो. साधारणपणे हा जिवाणू फुफ्फुसांना आपल्या विळख्यात घेतो. विशेष म्हणजे, शरीरावरील केस आणि नख सोडल्यास प्रत्येक अवयव टीबीच्या विळख्यात येऊ शकतो.२४ फेब्रुवारी हा दिवस क्षयरोग निवारण दिन म्हणून पाळला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला मेडिकलच्या श्वसन रोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.डॉ. मेश्राम म्हणाले, क्षयरोग हा दोन प्रकारचा असतो. सुप्त (लेटेंट) व सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह). सुप्त टीबीमध्ये जीवाणू शांत राहतो आणि लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र यातून सक्रिय टीबीमध्ये परिवर्तन होण्याची १० टक्के शक्यता असते. सक्रिय टीबीमध्ये प्रतिकारशक्ती या जीवाणूला पसरण्यापासून थांबवू शकत नाही परिणामी व्यक्ती आजारी पडतो. योग्य उपचार न केल्यास टीबी प्राणघातक ठरू शकतो.

असा पसरतो क्षयरोगक्षयरोग हा खोकल्यातून किंवा शिंकण्यातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचतो. धूम्रपान करणाऱ्यांना, मधुमेह किंवा एचआयव्ही, एड्सबाधिताना सक्रिय टीबी होतो. दोन किंवा तीन आठवड्यापर्यंत खोकला, थुंकीतून रक्त येणे, सायंकाळच्यावेळी ताप येणे, भूक आणि वजन कमी होणे, थकावट वाटणे, वारंवार बद्धकोष्ठता किंवा हगवण लागणे आदी लक्षणे आहेत.सर्वाधिक धोका मधुमेही, एचआयव्हीबाधितांना क्षयरोग रुग्णाच्या संपर्कात येणारा मधुमेहींना, एचआयव्हीबाधितांसह कुपोषिताना, स्टेरॉईड्स घेणाऱ्यांना, दारूचे व्यसन असणाºयांना या रोगाचा धोका जास्त असतो. वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका आणि डॉक्टरांनाही याचा धोका संभवतो.

निदानासाठी विविध तपासण्यायोग्य वैद्यकीय तपासणीसोबतच छातीचा एक्स-रे, पोटाची सोनोग्राफी किंवा पोटाचा सीटी स्कॅन, शरीरात असलेले द्रव्याचे तपासणीतून क्षयरोगाचे निदान केले जाते. ‘टीबी बेकिलस’ दिसणे हे एक मानक परीक्षण आहे. मात्र प्रत्येक प्रकरणात हे शक्य नाही. टीबी जीवाणू, ‘लिम्फ नोड’साठी ‘अ‍ॅस्पिरेशन सिटोलॉजी’, थुंकीची चाचणी, आणि ‘टिश्यू बायोप्सी’ केली जाते. ‘क्वांटिफॉर्म टीबी गोल्ड टेस्ट’ आणि अन्य ‘इम्यूनोलॉजिकल टेस्ट’ही उपयोगी पडतात.

टॅग्स :Healthआरोग्य