शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

आधी पॅकेज नंतरच खोदकाम

By admin | Updated: April 20, 2017 02:43 IST

साहोली, सिंगोरी, डोरली व हिंगणा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वेकोलिने ताब्यात घेऊनदेखील अद्याप शेतकऱ्यांना नोकरी

साहोलीवासीयांनी दर्शविला विरोध : वेकोलिच्या मनमानी कारभारावर गावकऱ्यांमध्ये संताप पारशिवनी : साहोली, सिंगोरी, डोरली व हिंगणा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वेकोलिने ताब्यात घेऊनदेखील अद्याप शेतकऱ्यांना नोकरी वा मोबदला दिलेला नाही. दरम्यान, क्षेत्राच्या आमदारांच्या उपस्थितीत काम सुरू करण्याचा वेकोलिचा डाव साहोली येथील ग्रामस्थांनी मंगळवारी उधळून लावला. वेकोलि प्रशासनाच्या मनमानी कारभारावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करीत आधी शेतीचे संपूर्ण पॅकेज द्या, नंतरच शेतात खोदकाम करा, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी वेकोलि अधिकाऱ्यांना ठणकावले. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी साहोली परिसरातील शेतजमिनीवर खोदकाम करण्याचे ठरविले. त्यानुसार क्षेत्राचे आ. डी. एम. रेड्डी, उपविभागीय अधिकारी राम जोशी, तहसीलदार बाळासाहेब तेढे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायगोले, पोलीस उपनिरीक्षक अनिल राऊत, प्रवीण सोनोने व वेकोलिचे अधिकारी प्रस्तावित शेतजमिनीवर दाखल झाले. आमदारांनी वेकोलि अधिकाऱ्यांना खोदकाम करण्यासाठी मशीन आणण्यास आदेश दिले. मशीन प्रस्तावित शेतजमिनीच्या दिशेने येताना दिसताच शेतकऱ्यांनी वेकोलिविरुद्ध नारेबाजी केली. आधी संपूर्ण मोबदला द्या, नंतरच खोदकाम करा, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी खोदकामाला विरोध दर्शविला. काही जण मशीन अडविण्यासाठी धावले. यावेळी १५० शेतकरी उपस्थित होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे ध्यानात येताच आ. डी. एम. रेड्डी यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले. या चर्चेमध्ये शेतकऱ्यांनी आधी ११० लोकांना नोकरी देण्यात यावी, ८७ शेतकऱ्यांना पूर्ण आर्थिक पॅकेज देण्यात यावे, ओलित व कोरडवाहू शेतजमीन हा वाद सोडविण्यात यावा, सुनील सहारे, पांडुरंग कानफाडे, अतुल फुलझेले या शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, ज्या १८ शेतकऱ्यांना अल्प मोबदला मिळाला आहे, त्यांना नवीन दराने पूर्ण मोबदला देण्यात यावा आदी अनेक मुद्दे शेतकऱ्यांनी आमदार व अधिकाऱ्यांसमोर मांडले. चर्चेअंती आधी शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करू, त्यानंतर खोदकाम केले जाईल, असे वेकोलि अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी) तोपर्यंत एक खड्डाही खोदू देणार नाही वेकोलिसंदर्भात आमची बाजू पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमक्ष मांडली जाईल आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत शेतात एक खड्डादेखील खोदू देणार नाही, असा इशारा सुनील सहारे, पांडुरंग कानफाडे, नीलेश हेलोंडे, पंकज पिंपळशेंडे, मधुकर रांगनकर, योगराज उकुंडे, श्रीकांत चिकनकर, कमलाकर रांगनकर, बाळकृष्ण कुंभारे, विशाल ढोके आदींसह गावकऱ्यांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींना कुणाचे हित साधायचे? वेकोलि प्रशासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळण्यापूर्वीच शेतजमिनीवर खोदकाम करण्याचे प्रयत्न चालविले. यामध्ये आ. डी. एम. रेड्डी यांनी मध्यस्थी करीत ग्रामस्थांसमक्ष खोदकाम करण्याचे निर्देश दिले. यातून आमदारांना वेकोलि अधिकाऱ्यांचे हित साधायचे असल्याचेच दिसून आले. त्यामुळे लोकप्रतिनिधी नेमके कुणाचे हित साधताहेत, असा संतप्त सवाल साहोली- सिंगोरी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील सहारे यांनी उपस्थित केला.