शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नागपूर मेट्रो रेल्वेच्या बांधकाम साहित्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी २५ हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 21:48 IST

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या बांधकामात उपयोगी येणाऱ्या मटेरियलच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी यावर्षीच्या प्रारंभी ‘ब्यूरो व्हेरिटाज’ नावाने जामठा येथे विश्वस्तरीय प्रयोगशाळा सुरू करण्यात आलीअसून आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देब्युरो व्हेरिटाज या नावाने जामठा येथे क्वॉलिटी कंट्रोल लॅब

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या बांधकामात उपयोगी येणाऱ्या मटेरियलच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी यावर्षीच्या प्रारंभी ‘ब्यूरो व्हेरिटाज’ नावाने जामठा येथे विश्वस्तरीय प्रयोगशाळा सुरू करण्यात आलीअसून आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.महामेट्रोच नव्हे तर इतर शासकीय, निमशासकीय आणि खासगी कंपन्यांना या प्रयोगशाळेची मदत होत आहे. येथे प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. हा उपक्रम महामेट्रोसाठी आर्थिक स्रोताचे एक उत्तम माध्यम ठरल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतानादिली.महामेट्रोचे हिंगणा आणि जामठा येथे कास्टिंग यार्ड आहेत. जामठा येथील यार्डमध्ये कॉन्क्रिट, रेती, सिमेंट, टाईल्स आदी सामग्रीची तपासणी अनुभवी आणि तज्ज्ञ चमूकडून करण्यात येते. कास्टिंग यार्डमधील प्रयोगशाळेत सामग्रीच्या नमुन्यांची तपासणी होऊन त्यातील काही नमुने जामठा येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. या ठिकाणी नमुन्याची गुणवत्ता ठरल्यानंतरच बांधकामात त्या सामग्रीचा उपयोग करण्यात येतो. आतापर्यंत ३५ नमुने नामंजूर करण्यात आले असून त्याची प्रमाण ०.१४ टक्के आहे. सिमेंट नमुन्यांची तपासणी तापमान आणि आर्द्रतेचे कृत्रिम वातावरण निर्माण करून केली जाते. चार हजार चौरस फूट जागेत सर्व उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा आहे.

२४ महिन्यांत ३५०० सेगमेंट तयार होणारकास्टिंग यार्डमध्ये मुख्यत्वे आय-गर्डर आणि सेगमेंटचे कास्टिंग केले जाते. आतापर्यंत एकूण ११५० सेगमेंट तयार करण्यात आले असून २४ महिन्यांत ३५०० सेगमेंट तयार करण्याचे लक्ष्य आहे. कास्टिंग यार्डमध्ये २४ तास काम करण्यात येत असून ७५० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. येथे सहा आडवे आणि सात उभे कास्टिंग बेड आहेत. यात दिवसाला १५ सेगमेंट आणि ६ आय-गर्डरप्रमाणे २१ युनिट तयार केले जातात. तपासणीनंतर कार्यस्थळावर पाठवून त्याचे लॉन्चिंग करण्यात येते.कास्टिंग यार्ड २३ एकर क्षेत्रफळजागेत असून आय-गर्डर आणि सेगमेंट २४ ते ३६ तासात हलविले जाते. बांधकामात वापरण्यासाठी २८ दिवसांनी पूर्णपणे तयार होतात. एका सेगमेंटचे अंदाजे वजन ४० टन आणि गर्डरची लांबी ३१ मीटरपर्यंत आहे. निर्मितीत दोष आढळल्यास ते सेगमेंट आणि गर्डरचा दुसरीकडे कुठेही उपयोग होत नाही.चर्चेदरम्यान महामेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक अरुण सक्सेना व सुशील कुमार, उपमहाव्यवस्थापक अखिलेश हळवे व के.सी. तायडे, मीडिया प्रभारी सुनील तिवारी आणि जनरल कन्सलटंटची चमू उपस्थित होती.

टॅग्स :Metroमेट्रो